Skip to main content

Posts

अवघं आणि बरंच काही 🍃

लिहून काढता काढता वेळ काढता यावं , अश्या काळात आलेले आपण, महत्वाचं काय आणि मूल्य कितीचा खटाटोप सारा, गिग वर्कर्सना किती आराम मिळत असेल आणि सुट्टी आपली सुट्टी त्रासदायक, संवाद कमी मानवी संवादात गैरसमजाची भीती माणसाला माणसापासून दूर ढकलत असताना, नाईलाजाने दोन शब्द बोलावे आणि रात्री छप्पराने आपला पश्चाताप आर्त होऊन पहावा.. पैसे जात येत असताना पण साठा पैशाचा किती त्यावर ठरणारे मान अपमान फाडत नेतात नैतिकतेचा सदरा कचाकच, आनंदी आणि समाधानी माणसाची कबर मलकटलेली लादी प्लास्टरचीच का असते ह्याची उत्तरं शोधावी आणि पुन्हा प्रात्यक्षिक जीवनात पायउतार व्हायला सकाळ तयार असते नव्या उमेदीने, लक्ष्य हवं माणसाला, माणसाने आवाजवी स्वप्न बघून त्याचा प्रयत्नात पार डुंबून जावं आणि गंभीर, मानसिक दुःखाचे मैथुन करून घ्यावं, लय आनंदी राहण्याचा, दाखवण्याचा प्रयत्न करणारे दांभिकतेचि आठवण करून देतात, मनमोकळे असावे संवाद ही अपेक्षा म्हणून ठीक आहे, उरली आहे.. माणसांला जर तर आहेच, शक्यता आहेत, अनेक वळणं आहेत मग सगळं नीटच असावं नेटकं, हा अट्टाहास वाटतो, चूक झाली आणि पुन्हा पुन्हा करता यावी आणि मग उभार घ्यावा...
Recent posts

सत्याचे प्रयोग आणि मी 🌱

काम करताना केवळ विद्यार्थ्यांना शिकवणे एवढीच आपली जबाबदारी नसते; तर स्वतःच्या आयुष्यातील अनेक चढ-उतारांमधून शिकत राहणेही तितकेच महत्त्वाचे असते. अलीकडे महात्मा गांधीजींचे ‘सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा’ हे पुस्तक वाचण्याचा योग आला. हे पुस्तक वाचताना गांधीजींच्या आयुष्यातील प्रसंग आणि माझ्या शिक्षक प्रवासातील काही अनुभव यांच्यामध्ये एक वेगळे नाते जाणवले. आपण एखादे काम मनापासून करत असतो, काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करत असतो; पण प्रत्येक वेळी आपल्या प्रयत्नांचे कौतुक होईलच असे नाही. उलट, आपल्या आजूबाजूला आपल्या प्रगतीकडे असूयेने पाहणारी माणसेही असतात. कधी आपल्या प्रयत्नांवर प्रश्न उपस्थित केले जातात, कधी गैरसमज निर्माण होतात, तर कधी आपण केलेल्या चांगल्या कामाची दखलही घेतली जात नाही. अशा वेळी मनात निराशा निर्माण होणे स्वाभाविक आहे. अधांतरी काम करताना या गोष्टींचा अनुभव अधिक प्रकर्षाने येतो. मर्यादित साधने, अनेक जबाबदाऱ्या, अपेक्षा आणि त्याचबरोबर स्वतःच्या आयुष्यातील ध्येय, या सगळ्यांचा समतोल साधत पुढे जाणे ही एक प्रकारची रोजची परीक्षा असते. कधी कधी आपण एखाद्या कामासाठी खूप प्...

उभे असू जिथे, तिथे नवीन परीक्षा द्यायला🖤💫

           एक मोकळं माळरान आहे आणि मध्ये एकटंच झाड उभं आहे, पाठीमागे सूर्य मावळतोय, मस्त छटा दिसत आहेत, काही ढग काळे आहेत, काहींना सोनेरी कडा आहे. खाली जमीन तांबडी, तडे गेलेली. वाळलेल्या काड्या, जमवली तर फाटी जमतील गोयलाभर . सगळं शांत. पण त्या शांततेत एक कोलाहल पण जाणवतो आजकाल.... हुबेहूब वाटावं असं वातावरण.... आपण जन्माला येतो तेव्हाच पहिली परीक्षा सुरू होत असते, रडलास का नाही? श्वास घेतलास का नाही? वजन किती? पहिल्या दिवसापासून आपल्याला मोजलं जातं, तोललं जातं. मग शाळा सुरू होते. पाटी-पेन्सिल, दप्तराचं ओझं, आणि मार्कांचं टेन्शन. दहावी म्हणजे आयुष्याचा टर्निंग पॉइंट. बारावी म्हणजे करिअरचा पाया. CET, नोकरीसाठी इंटरव्ह्यू, पैसे, व्यापार....पेपर संपतच नाहीत, आयुष्याचा पेपर कधी पुढे पुढे सरकत जातो समजतच नाही...    पण खरं सांगू? हे सगळे पेपर सोपे होते. कारण त्यात प्रश्न छापलेले असायचे. चार पर्याय असायचे. वेळ ठरलेली असायची. पास-नापासचा निकाल ठरलेला असायचा. पण इतर बितर चे प्रश्न आपण दूर लोटत जातो आणि खरी परीक्षा तेव्हा सुरू होते जेव्हा उत्तरप...

तुला कोड्स मध्ये शोधेन म्हणतो 🩶

उन्माद संपून जाईल तेव्हा  खरे उरतील सकल जण  पण त्याविन मग काय उरेल  जमिनीत काय उगवेल  आणि कोण काय पुरेल  घरी काही,  कुणाला न बोलता येऊन दाखव  कुणाचा ना रुसवा घेऊन ये  न कुणाला दिसता फिरून दाखव  एक दिवस कुणाची शपथ न घेता ये  ये असाच कधीतरी रिकामे रिकामे सागर भर  टेबलाचे वेगळे वेगळे परिप्रेक्ष दाखव  दाखव माणसाची उत्क्रांती कशी झाली  किती मिथकं आणि किती गोष्टी लयास गेल्या  उरले सुरले कसे सावरले  आवरले आणि आवरून कसे माजले सारे  एकजात कसे  वातावरणीय ढोबळ मनाने अंदाज बांध  महामारीवर रडलास तसं युद्धावर रडून दाखव  फोड खापर असंख्य गोष्टींवर जगावर  नाहीतर नाही तर, तारे आहेत लुकलूकतात  त्यांची उत्पत्ती बोल  ठिपका आहोत आपण असे मार एक एक  झोपी जाऊन पुन्हा ये ग्लिच बनून मित्रा  तुला कोड्स मध्ये शोधेन म्हणतो.....

माणसाने गझल ऐकली पाहिजे 🌼

माणसाने दुःखात गझल ऐकली पाहिजे दुःखात कवाली आणि सुखात बॉलिवूड गाणी ऐकली पाहिजेत पहाटे अभंग मदमस्त रॅप ऐकूनच माज केला पाहिजे पाहिजे क्लासिकल पण क्वचित  पंगतीत उठ बस असायला नास्तिक असावं लॉजिकने आस्थिक असावं सोयीने  मजबूर असावं सगळ्या दिशेकडून वळून पाहताना डोळे समोर असावे  डोळे कशाने थकलेत हे समजू नये पुढच्याला समज गैरसमज असावे  पुढचा कॉन्फयुज्ड करून सोडावा मोडावा अहंकार एका एकाएकाचा आपला स्वतःचा कमीपणा करून घेऊन पापं मोजता मोजता  बोटं कमी करावी पुण्य सावली सारखं जवळ असून लंब असावं अंदाज बांधू नये कुणी कुणी आकलन तर करूच नये केलेले अंदाज चुकावे आपल्या आपल्या मध्ये एक एक वयक्तिक फसावे माणूस म्हणून वागावे हे आपणच उगा बोलावे ठेचकाळलेली पावलं असावी उठाव्या पाऊलखुणा सगळीभर आसमंतात विरोधाला विरोधाभासाने उत्तर द्यावी अंगलट गोष्टी विसर्जित करावी मित्रांचे चांगले सल्ले घ्यावे  कपडे धुतात तसे करावे ते करावे साबण राहावा भांड्यानावर धुतल्यावर  तशी सल राहावी मनाच्या पटलावर  आणि जेव्हा काहीच काही नसेल तेव्हा  निर्विकार आठवला पाहिजेल  विश्वाचा...

जुलै संपता संपत नाही 🌼

जुलै संपता संपत नाही  असं काय आहे ह्या मध्ये  अचानक वेळ सरत जातेय परवानगी घेतल्याविना  जुलै चिवट आहे आहे दलदली सारखा असा भासतो कि सुख उपवासाला आणि दुःख सणाला जुलै असलं काय काळ आपल्या सोबत खेळ खेळत असतो कॅलेंडर फासे टाकत असतो जुलै अडकून राहिल्या सारखा विचार करायला लावतो जुलै असं काय होतं न्हवतं हिशोब करायला लावतो जुलै कुठे गेलंय हे सारं  नको असावा महिना हा  अडकून राहण्याचा  अस्तित्वाच्या शोधाचा सगळ्यात स्लो असलेला जुलै पळता पळत नाही जुलै संपता संपत नाही

आणि जिंकलो 🤍

चौदा वर्षाचा मुलाने सिक्सर शतक मारणं  आपण चषक जिंकणं  आपण किती रन्स झाले  किती ऑऊट झाले  किती गेले आणि किती बदला घेतला  आणि जिंकलो  आपण किती इनिमी किल्ल केले  आपण किती चिकन डिनर केले  आपण किती गोल्ड डायमंड प्लॅटिनम झालो  आणि जिंकलो  आपण किती कुणाची मारली  कुणासोबत कुणाची किती जिरवली  कुणाला किती लायकी दाखवली  आणि जिंकलो  आपण किती पैसा कमावला  आपण किती भारी नोकरी केली  किती सुंदर बायको केली  कसा संसार केला  आणि जिंकलो  आपण किती सर्विस केली  किती अनुभव आहे  किती पैसे उकळले  किती कुणासाठी काय केलं  आणि जिंकलो  आपण किती माज केला  आपण किती उन्माद केला  आपण कुणालाच भिलो नाय  मी अजिबात घाबरत नाय  आणि जिंकलो  इतकं सोपं सोपं हे सगळं नाय लिहलेलं समजेल इतकं पण सोपं नाय  कोण मला काय बोलेल इतकं पण सोपं नाय  कुणाच्या भावना दुखावतील इतकं पण सोपं नाय  दुखावल्या तरी काय बोलू शकत नाय  लिहीत इतकं पण सोपं नाय  बाकिआलबेल