Posts

Showing posts from October, 2023

महत्वाच काहीतरी

Image
यात काहीही शंका नाही कि शिक्षण माणसाच्या आयुष्यात फार महत्त्वाचं आहे. त्यामुळेच आपल्या संविधानात मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद कलम २१(A) अंतर्गत करण्यात आली आहे. तर अस आहे कि ७०% लोकसंख्या, जर खाजगीकरणा झाले तर हा खर्च उचलू शकणार नाहीत . गरीब व कष्टकरी मूले जर काही प्रमाणात शिक्षण घेत असतील तर मोफत शिक्षणाच्या धोरणामुळे, मूलभूत हक्काच्या मूलभूतपणाचा गाभा प्रतिष्ठा राखणे हा आहे, जर शिक्षणाचे खाजगीकरण झाले तर एक ठराविक वर्गच त्याचा लाभ घेऊ शकतो आणि इतरांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होईल. शिक्षणाकडे जर व्यवसाय म्हणून पाहिलं गेलं तर शिक्षण आणि ज्ञान देणे हे मुद्दे दुय्यम होऊन फक्त आर्थिक प्राप्तीकडे कल वाढेल. मागच्या वर्षी १ ते २० पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याची तयारी प्रशासनाने दाखवली होती तेव्हा मी लेख लिहलेला होता आणि आता देखील 'समूह शाळा' धोरण राबवण्याचा हट्ट प्रशासनाने केला आहे, या धोरणाला सगळीकडून विरोध चालू असताना देखील हा सर्वे व धोरण पुढे रेटले जात आहे. गावपाड्यात शाळा जवळ आहे म्हणून येणारी कितीतरी मुलं आहेत किंवा पोषण आहार मिळतो म्हणून येणारी मुलं आहेत आणि ही

चाफा कधीच कोमेजू नये 🌼

Image
चाफा कधीच कोमेजू नये हा माझा हट्ट खरा त्याचा वास घेत राहायला हात वरती करू नये  छातीपाशी खिशात ठेऊन घेता यावा निरंतर खरं तर केसं पण पिकू नये कुणाची नां कुणाला ययातिची फिलिंग यावी नां कुणी यतीची वाट पाहावी सगळं कसं चालू राहावं कष्टाविना चालू रहावं दुःखाविना  असावं सगळं कसं आलबेल चाफा सुकू नये कधी सुवास कोमेजू नये कधी कधी वाटतं त्यांना तोडू पण नये त्यांना पण जगू द्यावं असंच सुवासिक नाकं न्ह्यावी फुलाजवळ होऊ नं द्यावा मृत्यू देव,माणूस कुणाच्या चरणी नको कुणाचा आवडता नको होऊ द्यावं त्याला चाफ्याची जिंदगी त्यालाच माहित सुंदरतेचे भोग सगळे आवडतीचे रोग सगळे मग म्हणाल चाफा बोलेना चाफा चालेना कसा चालेल कसा बोलेल चुकून विचार येऊ नये चाफा कधीच कोमेजू नये अजिंक्य रोकडे #बाकीआलबेल 

मी मेसेज करत जातो 🤍✨

Image
काल स्वप्नात तिला काल्पनिक hii केला मी, बोललो काहीसं, सांगितलं भूक लागतेय फार आणि खूप सारं खाऊन पुन्हा भूक लागतेय नाही खाल्लं कि विकनेस येतो विचाराने, तू नाय नाय करत तरी माझा विचार करत असशील का तुला भूक लागत असेल का कि जेवण झाला का हा काल्पनिक मेसेज माझा जातोय तुला मग मी गारव्या मध्ये गरम शोधत बुरमूस टोचणारी घेऊन हवं नको असलेलं ऍडजस्ट करत खाज उताणा झोपून तुझ्या भावना चेपत जातोय निरामय आत्म्याच्या भाराखाली हलक्या शरीराने तेव्हा तुला मेसेज जातोय झोपलीस का, तू झोपत अशील का विचाराने झोपेत साप वगरे येतात मी लय घाण घाण स्वप्न बघतोय लोकांना मारतोय, apocalypse पाहतोय पेट्रोल वगरेचा जागतिक पाऊस पडत आहे मी हतबल सगळं पाहून पळत आहे लोकं पळत आहेत मी घाबरून जातोय खुश होतोय लोकांना पळताना आणि अचानक माझा तोल जाऊन पडतोय आणि उठतोय झोपेतून तेव्हा माझी  ऍड्रेणिल रश जो सत्यात नाही तो स्वप्नांत पूर्ण झाला म्हणून उठून घाबरलेला खुश मी, मी घाण स्वप्न असंच पाहत गेलो, गिल्टी झालो, चिवळत बसलो गु घाण, तुला असं झालंय का कधी, असं निरपेक्ष वेडेपणाची स्वप्न तुला अधून मधून पडत असतील का तेव्हा मी मेसेज करतो,

बाकी आलबेल अर्थहीन आहे 😵‍💫

Image
कविता करूया का विचाराने कविता होतेय अनामिक लागलेली आर्थिक भीक कवितेच्या आड येतेय विचार आणि प्रगल्भता उसने आलेले विचार असामान्य असलेले विचार असामान्य असलेले आचार आणि ह्यात काहीच साम्य नसलेलं आयुष्य ह्या सगळ्या कोलाहालात झालेला कवी लाचार कविता उरात आहे सत्यात नाही सत्यातून खोट्यात पण नाही येत नाहीय जोर लावून वाटतंय करावी भावना आहे खवून शब्द यमक होईल पण करतो उसवून उगच शिवी नको बघुया फसवून साला आता मनं सांभाळू वाटतात पत्रे उडाले म्हणतात नां लागले कि कविता सोज्वळ करतोय असल्या हजारो विचारांचं मंथन करतोय कोण म्हणतंय कवितेला अर्थ हवा कोण म्हणतंय त्याला यमक हवं आपल्याला पटलेलं रुचलेलं सुचलेलं अर्थहीन काही का असेना अर्थहीनच गमक हवं बाकी आलबेल कविता करत जातो बाकी आलबेल गृहीत धरत जातो बाकी आलबेल अर्थहीन आहे मर्म शोधू नका त्याच्या शब्दात अर्थ शोधू नका #बाकी आलबेल अजिंक्य रोकडे