Posts

Showing posts from August, 2022

असं पण म्हणतात

तू अंतर्यामी आहेस माहीत आहे असं म्हणतात असं पण म्हणतात तू सकाळ उगवतो तू रात्र जागवतो भूक भागवतो तू डोहाळे देतो सुखाचे तुझे आभार मानायचे असं देखील म्हणतात म्हणतात आकाशात तारे आपण गोल फिरत असतो चंद्र आपल्या भोवती फिरत असतो तोच समुद्र धरून ठेवतो तुझं ऐकतो अस पण म्हणतात तू देतोस फुलं मग स्वतःच्या पायावर ओढून घेतोस मग कोमेजले की बाजूला करतोस अस पण म्हणतात की तूझे नाम घ्यायचे तू माझ्यात पण आहे तू त्याच्यात पण चराचरात आहेस असा सर्वव्यापी आहेस परमात्मा अस पण म्हणतात तू कर्म पाहतोस मागचं पुढचं सगळं आणि न्याय पण करतोस खरं खोटं सगळं करतोस म्हणे साधं सोपं जे घडतं ते पण तूच करतोस माझं अस काय आहे माझं अस म्हणतात गंडलय सारं फुकाचा सोंगट्या साऱ्या पारावर चर्चा माझ्या अस पण म्हणतात मी  मी उंटाच्या ह्याचा मुका घेतो मी भाडं खोलीत राहून ब्लॅकहोल पाहतो असाच उडत देजावू मध्ये जातो अस पण म्हणतात  प्रेमात गुंततो दिसेल त्याला जवळ करतो जवळ घेऊन कोलते सगळं सगळं हाती लागेल ते फोल करतो अस म्हणतात तुझं कौतुक करावं  तू अंतर्यामी आहेस माहीत आहे असं म्हणतात अजिंक्य रोकडे ३१ जुलै २०२२