Posts

Showing posts with the label Peace

तथागता सारखा प्रवास जमला पाहिजे राव😌

Image
स्थित्यंतरे नको वाटतात , जैसे थे ची भूमिका किती सुखावह वाटते , प्रवास वेगात घडतो , वाचन , गाणी , कव्हर सोंग्स नाहीतर अभ्यास , अगदीच काही नाही तर गर्दीचं वाचन , केसांचे रंग , पेहराव , अंगकाठी , स्वभाव , शिव्या , आवाजातील हेल , राग , लोभ , प्रेम किंवा जास्तीत जास्त स्वार्थ…. घरी असणं , स्वतःबद्दल लिहिणं , स्वतःची लाल करणं , स्वतः खच्ची होणं , सर्व ठीक असत पण प्रवास आला की वेग आला , वेगाला नसतात थेहराव , गाडी पुढे जात असते , आपण पाहत बसायची मागे जाणारी झाड , डोंगर , माकडं , धड काही पाहता ही येत नाही … दगडं सारखीच वाटतात, त्यांना आपण रिलेट होतो , प्रकार बदल आपल्याला करता येत नाहीत , आपल्या हातात नाही , मोसमी कारणं एकतर मुलामे तरी चढवतात नाहीतर आकार तरी देतात , प्रवासात न कमावलेले पैसे पण खर्च होतात , मंदिरांना पाहून कौल पण लावता येत नाहीत मध्ये येत असतो तो वेग , घाटात मंदावतो , पण तेव्हा एकतर दरी पाहता येते नाहीतर डोंगर , हेच तर आवडत नाही ,अशीच परिस्थिती का नेहमी ? निवड !! का करायची निवड आणि एकच का ?? प्रवासात पाणी पण विकलं जात , बारमाही परा आठवतो , रगील असलेले मिनरल आठवतात … आ...