Posts

Showing posts from August, 2023

मी त्याचा सारखा लिहितोय 💛

Image
मी त्याच्या सारख लिहितोय  आलबेल बिंदास होतोय  नाक्यावरचा कवी झालोय  कधी किरकिर कधी काव्यात वाहतोय  मी आयुष्यात गंडलोय जसं मद्यधुंद कवीच नृत्य बनतोय  हजारो संधीचा लाभ एक झालोय  अंधार स्वीकारत हास्य फेक होतोय  माझे शब्द कच्चे म्हणे ग्रामर गंडलय यमक हरलंय आमचं आयुष्य सरलंय भ्रमनिरास झालेल्या जगाचे वाभाडे मोजतोय मी पितोय सोबत शब्दांचा जुगार खेळतोय क्षणभंगुर आनंद शोधतोय अर्थाच्या चेतनेचा पाठलाग करतोय माझी कविता समजावी म्हणून त्या सत्याची चावी  शोधतोय माझे शब्द निषेध केलेत ते नॉर्मल करतोय अनुरूप असं काही नाही त्या अनुरूपतेच्या विरूद्ध बंड करतोय समाजाच्या रूढी आणि समज त्या मधील अंतर मोजतोय मी बहिष्कृत, चुकीचे आणि हरवलेल्यांना आलिंगण देतोय ज्यांनी आयुष्याला आवाहन दिलंय त्यांना आवाज देतोय मी प्रेमाबद्दल लिहितोय सुंदर जे आहे ते हवंय आणि दुःखद जे आहे ते पण शोधतोय हिरमुसली हृदये आणि राख झालेली स्वप्ने सावडतोय आणि प्रेमाकडे वळतोय मी सांसारिक देखाव्याकडे सुंदरतेच्या नजरेने क्वचित पाहतोय  गलिच्छ बारमध्ये स्वतःला शोधतोय एकांतीत खोलीत हजार पुस्तकं होतोय मी बिंदास होतोय किमान आलबेल होतोय किं

तुझ्या दोन्ही त्या उरोजांनच्या मधोमध 🌼

Image
तुझ्या दोन्ही त्या उरोजांनच्या मधोमध रेलून पडल्या आहेत कथा कविता माझ्या त्यावरील तिळावर लिहला आहे सस्पेन्स मोठा काखेतल्या अस्थाव्यस्थ दशेवर खुश असलेली पटकथा खुलून दिसेल सारं जग नैतिकतेच्या कचाकडी दुनियेत सौंदर्य पण कसं सापेक्ष असतंय तू दिलेल्या जखडून ठेवलेल्या आठवणी अजून हातात तश्याच निस्तेज पण प्रखर धावतात रक्त जसं प्रवाही होतंय तसं सगळं अजून होतंय काटा नको असताना टोचणाऱ्या फिलिंग्स कश्या आल्हाददायी उठून दिसेल हे सारं दुखणं जेव्हा ओलावा कप्पर होईल सकाळी बघ प्रेम कसं निरपेक्ष असतंय असण्या नसण्याने नसलेली तू जेव्हा नसताना येतेयस तेव्हा मी पण असलो नसलेलो जेव्हा असतोय तुझ्यात तुझ्यातून मग मी गो थ्रू होऊन आडवा इनफ्रंट होत जातोय हे सगळं लिहून येतंय हळुवार जश्या रेघोट्या ओल्या बघ असं ओलावा असतो हे सारं असं आलबेल असतंय.. बाकीआलबेल अजिंक्य रोकडे

आपण गिनतीतच न्हवतो 🌼

Image
हिशेब मांडायचास पोरांना दाखवायसास पावत्या गंडत #डीत गेले हिशोब आता गिनतीत नाहीस गिनती विसरलास आपण न्हवतो प्रेमात न्हवतो नात्यात न्हवतो जातीत न्हवतो जातीत असलो तर वयात न्हवतो आपण न्हवतोच आपण कधीच गिनतीत न्हवतो तसे होतो समसमान पर्याय होतो पण कधी योग्य न्हवतो योग्य असलो तरी भ्रष्ट न्हवतो भ्रष्ट असलो तरी प्रामाणिक पण न्हवतो आपण न्हवतो आपण कधीच गिनतीत न्हवतो आपण पन्नास ते साठ होतो कधी नव्वद तर चुकून न्हवतो चुकून नव्वद असलो तर भ्रष्ट होतो आपण मतमतांतरात मत न्हवतो आपण कधी स्पष्ट न्हवतो स्पष्ट असलो तरी मजबूर न्हवतो मजबूर असून गाफिल न्हवतो आपण कधीच गिनतीत न्हवतो आपण खून दरोडे न्हवतो आपण सुजाण वगरे पण न्हवतो पण न्याय सांगतील तो पण न्हवतो आग क्रांती वगरे पण न्हवतो आपण  न्यायनिवाडा न्हवतो आपण न्हवतो आपण गिनतीत पण न्हवतो आपण सुखी कधीकधी न्हवतो आपण दुःखी नेहेमी न्हवतो आपण गंगा आकाश क्वचित न्हवतो सारासार विवेक चुकून न्हवतो गंडत गेलो पण बरोबर न्हवतो आपण न्हवतो आपण कधीच गिनतीत न्हवतो अजिंक्य रोकडे #बाकीआलबेल