Skip to main content

Posts

Showing posts with the label poems

कधी जॉन कधी मी…

आजकाल न ठरवून दिसतेस  खूपच बेकार दिसतेस घरी येतो जॉन ऐकतो  कोणीतरी साला त्याला पण डीसलाईक करून जातो कुणी त्याचा राग करतो ह्यावर पण मला राग येतो  मग तो म्हणतो  बोलते क्यों नही मेरे अपने  आबले पड़ गए जबान में क्या  तसा त्याला लिहितो मग पोस्ट नाही करत सल्ला उपदेश टीका  पुस्तकं मग खोलीत त्याची गणना कोण तोलित  मग जॉन येतो बोलतो  कभी आराम नही पा सकता  एकच दुःख आहे  त्याला पण तुझा चेहरा  कधी असा बोलतो नन्तर मनमौजी होतो  कधी हिंदुस्थान होतो कधी तो पाक होतो कधी अमरोहात जन्म घेतो , कधी अर्धा पाक मध्ये मयत होतो शिलगवतो शब्द आणि सिगारेटचा धूर कधी मांडीवर थाप कधी केसांना झटका डोळ्यात महापूर जॉन भारी पण मान नाही शेवटी मरतो दोघे  कधी जॉन कधी मी… अजिंक्य रोकडे

भाषेचं काय...

भाषेच काय शुद्ध वाणी दुष्काळी भागात बोरिंगचं पाणी भुकेला कसली भाषा हाय ब्रिंजल काय आणि वायंगा काय एकच भाजी आयेने विळ्यावर घेतली  भाषेची जागा भुकेने घेतली बस्स का भैय्या  पठारावर बोलला कोकणात बोलला  हट्ट साला भैया साईडला घेऊन कोलला कोकणातली माणसं शहळ्यांनी भरली पठारावरची लाव्यावर तरली भाषेच काय शुद्ध वाणी दुष्काळी भागात बोरिंगचं पाणी भूमीपुत्रांची माती  एस यु वी च्या चाकाला पेट्रोलचे दर  शेम्बुड आपल्या नाकाला भाषेच काय शुद्ध वाणी दुष्काळी भागात बोरिंगचं पाणी पाण्याला विहीर  विहिरीला मोटर आमचा तो नाला तुमच ते गटर हेल तुझा चुकला  आता झाला राडा  भाषा बघ त्याची भाषेच काय शुद्ध वाणी दुष्काळी भागात बोरिंगचं पाणी अजिंक्य रोकडे