Posts

Showing posts from December, 2022

वाटाड्या

Image
वाटाड्या वडिलांना रोजच्या प्रमाणे नाक्यात सोडलं आणि पेट्रोल टाकायला पंपावर निघालो तर highway वर एक मुलगा tourist बॅग घेऊन  चालत  होता मी पुढे  निघून  गेलो पुन्हा मागे फिरुन त्याला थंबवलं त्याला त्याचा प्रवासाची माहिती विचारली तर तो म्हणे बेंगलूरू वरून आलो आहे hitch hiking करत संध्याकाळ पर्यंत मुंबईला पोहोचायचं आहे, रत्नागिरी मध्ये एका गॅरेजवाल्याकडे काल वस्तीला होता, मी तुझ्या बद्दल काहीतरी लिहीन असं बोललो आणि एक सेल्फी घेतली  गाडीवर बसूनच  नंतर मला वाटलं घरी नेऊया आणि ह्या असा प्रवास करण्याबाबत माहिती घेऊ किती दिवस झाले आपल्याला पण असंच काहीतरी करायच आहे, घरी  आल्यावर त्याला आमचं कोकणी पद्दतीचा घर बाहेरच आवडलं आणि नकळत त्याने व्हिडिओ चालू केली आणि कानडी  भाषेत घराची  आणि माझी माहिती देऊ लागला आता आपला आणि कॅमेराचा काही संबंध  नसताना डोळे वर खाली करत मी माझी माहिती वगरे सांगितली , घराबद्दल, इथल्या गावांबद्दल, लोकांबद्दल सांगू लागलो माझी सांगितलेली माहिती तो त्याचा भाषेत  रेकॉर्ड करत होता, माझी पुस्तकं दाखवली  आणि मग  चहा पाहुणचार  झाल्यावर मी त्याला सोनगाव कांदळवनात नेतो बाईकने वेळ असे