Posts

Showing posts from November, 2021

न्यूट्रल मी....😐

Image
स्थळ - सरकारी इस्पितळ        तर केसपेपरचे पैसे एकाने आमच्याकडे सुट्टे न्हवते म्हणून भरले , त्याला सर्दी ताप होता पण उपचाराआधी त्याला टेस्ट करायला सांगितली , आमचं काही वेगळं काम होतं , त्यात आम्हाला जाम मदत झाली , आमचं काम झालं आम्ही बाहेर निघायला आलो , पण तो व्यक्ती गाडीवर गडबडीत रागात स्पीड मध्ये जाऊ लागला , तिथला स्टाफ त्याला हाक मारत होता , आमचे पैसे भरले म्हणून आम्ही त्याला हाक मारत होतो थांबला , म्हणाला मला गरज नाही , दोन तास झाले आहे इथे साधी सर्दी आहे मला , म्हणून लोकं येत नाहीत तुमच्या अश्या वागण्याने ….!!! आणि तो निघून गेला , आम्ही सांगितलं जाऊदे त्याला …. मी म्हणालो , लोकांकडे संयम नाही … घरी आलो झोपलो.. ◆◆◆◆◆◆◆      मानव संसाधन विकास मध्ये आरोग्य हा विषय जाम hectic आहे , ह्या महामारीचा काळात सरकारी आरोग्य यंत्रणेच तस कौतुक केलं पाहिजे कारण हे काम कस चालतं ते मी सामाजिक कार्यकर्ते व pandemic नावाची सीरिज आहे त्यात भारतातील सरकारी यंत्रणेने एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात ह्या आधी आलेल्या महामारी व रोग कसे हातातळे तसलं काहीसं दाखवलं होतं , सगळ्या योजना भरभरून आह

आमच्या बाळाचा पहिला प्रवास..

Image
आमच्या बाळाचा पहिला प्रवास..... चिपळूणच्या पुराने आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागृतता आवश्यक असल्याचे अधोरेखित केले आहे. यासाठी खूप काही अभ्यासिकाची आवश्यकता नाही. आपल्या दैनंदिन व्यवहारातील छोट्या छोट्या बाबींचा बारकाईने विचार केला तरी खूप आहे. फक्त आपत्ती कडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन महत्वाचा आहे. मी आणि माझी पत्नी पायल आम्हाला आलेला अनुभव. आमच्या बाळाच्या जन्माची संभाव्य तारीख होती २० जुलै. पावसाचे दिवस असल्याने सहाजिकच काळजी वाटत होती. आपली वेळेला घाई गडबड होऊ नये म्हणून हॉस्पिटलला जाताना लागणारी बॅग पायलने एक महिना आगोदर भरून ठेवली होती. आठवेल तसं आणि परिस्थिती कशी असू शकते याचा विचार करून त्यात वस्तू भरत होती. सीझर झालं तर पाच सहा दिवस राहण्याची तयारी, वगैरे.  *सुवर्ण क्षण आणि यक्ष परीक्षा* आमच्या बाळाचा जन्म २० जुलै ला सुश्रुषा हॉस्पिटल, चिंचनाका, चिपळूण येथे झाला, फार मोठा आनंदाचा क्षण, त्यामध्ये दिवस आषाढी एकादशीचा, कोणत्याही मराठी व्यक्तीसाठी यापेक्षा विशेष दिवस तो कोणता! सम्पूर्ण दिवस शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. सामान्य प्रसुती झाली आणि दोघेही सुखरूप याचे खूप समाधान

कधी जॉन कधी मी…

Image
आजकाल न ठरवून दिसतेस  खूपच बेकार दिसतेस घरी येतो जॉन ऐकतो  कोणीतरी साला त्याला पण डीसलाईक करून जातो कुणी त्याचा राग करतो ह्यावर पण मला राग येतो  मग तो म्हणतो  बोलते क्यों नही मेरे अपने  आबले पड़ गए जबान में क्या  तसा त्याला लिहितो मग पोस्ट नाही करत सल्ला उपदेश टीका  पुस्तकं मग खोलीत त्याची गणना कोण तोलित  मग जॉन येतो बोलतो  कभी आराम नही पा सकता  एकच दुःख आहे  त्याला पण तुझा चेहरा  कधी असा बोलतो नन्तर मनमौजी होतो  कधी हिंदुस्थान होतो कधी तो पाक होतो कधी अमरोहात जन्म घेतो , कधी अर्धा पाक मध्ये मयत होतो शिलगवतो शब्द आणि सिगारेटचा धूर कधी मांडीवर थाप कधी केसांना झटका डोळ्यात महापूर जॉन भारी पण मान नाही शेवटी मरतो दोघे  कधी जॉन कधी मी… अजिंक्य रोकडे

विचारांची डिलिव्हरी

Image
 आज उन्हाची तीव्रता जास्त आहे हा युनिफॉर्म कालच धुतला होता पण कितीही धुतला तरी ड्युरेबल आहे ,  त्यामुळे घामाने लतपत झाला तरी आई त्याला सुतासारखा सरळ करेल . त्यात पाठीवरची आयताकृती निर्घृणच म्हणा ,अशी ही सुखवस्तूंनी भरलेली बॅग ...  होय माझी ओळख करून द्यायची विसरलो ,  मी डिलिव्हरी बॉय ,  या इ कॉमर्सच्या झंझावातात एक तीक्ष्ण असा भाला घेऊन उभा असलेला प्यादा . आयुष्य सोपं आहे माझं ,  वेयर हाऊस ते विविध कंपनीज ,  कंपनीज ते ऑफिस  आणि ऑफिस ते लोकांची घरं . तसं बेरोजगारांना इतक्या प्रमाणात रोजगार देणारे एकच सेक्टर असावं ,  अहं मी कोणी क्रांतिकारक विचारांचा डिलिव्हरी बॉय नव्हे ,  एक अल्पशिक्षित कमीत कमी पेपर वाचून विचार करणारा सर्वसामान्यच तसा. बस बागेतून सुखवस्तू हातात येण्यासाठी ही सारी फरफट चालू असते , आता तुम्ही म्हणाल की पोटासाठी करतो ,  पण माणूस तर उपभोगासाठी जास्तीत जास्त मेहनत करतो ना,  भविष्य सिक्युअर करण्यासाठी  आणि तसं पण बाजारातल्या सुखवस्तूंची लालसा कुणा सर्वसामान्य माणसाला होऊ नये बरं?         मला माझ्या कामाचा पहिला दिवस आठवतो , ८० ते ९० किलोमीटरचा प्रवास ,  वजन जवळजवळ नऊ ते दहा क