Posts

Showing posts with the label ऊर्जा

विचारांची डिलिव्हरी

Image
 आज उन्हाची तीव्रता जास्त आहे हा युनिफॉर्म कालच धुतला होता पण कितीही धुतला तरी ड्युरेबल आहे ,  त्यामुळे घामाने लतपत झाला तरी आई त्याला सुतासारखा सरळ करेल . त्यात पाठीवरची आयताकृती निर्घृणच म्हणा ,अशी ही सुखवस्तूंनी भरलेली बॅग ...  होय माझी ओळख करून द्यायची विसरलो ,  मी डिलिव्हरी बॉय ,  या इ कॉमर्सच्या झंझावातात एक तीक्ष्ण असा भाला घेऊन उभा असलेला प्यादा . आयुष्य सोपं आहे माझं ,  वेयर हाऊस ते विविध कंपनीज ,  कंपनीज ते ऑफिस  आणि ऑफिस ते लोकांची घरं . तसं बेरोजगारांना इतक्या प्रमाणात रोजगार देणारे एकच सेक्टर असावं ,  अहं मी कोणी क्रांतिकारक विचारांचा डिलिव्हरी बॉय नव्हे ,  एक अल्पशिक्षित कमीत कमी पेपर वाचून विचार करणारा सर्वसामान्यच तसा. बस बागेतून सुखवस्तू हातात येण्यासाठी ही सारी फरफट चालू असते , आता तुम्ही म्हणाल की पोटासाठी करतो ,  पण माणूस तर उपभोगासाठी जास्तीत जास्त मेहनत करतो ना,  भविष्य सिक्युअर करण्यासाठी  आणि तसं पण बाजारातल्या सुखवस्तूंची लालसा कुणा सर्वसामान्य माणसाला होऊ नये बरं?         मला माझ्या कामाचा पहिला दिवस आठवतो , ८० ते ९० किलोमीटरचा प्रवास ,  वजन जवळजवळ नऊ ते दहा क