Skip to main content

सुना है जंगलों का भी कोई दस्तूर होता है🌱


हैदराबाद मधील कांचा फॉरेस्ट (गाचीबोवली) रडत आहे. देशाचा राष्ट्रीय पक्षी रडत आहे.या दिवसात, या इतर भूतकाळातल्या अप्रासंगिक कोलाहलतून जर वायरल झालेली कांचा फॉरेस्ट मध्ये वृक्षतोड, जंगलतोड करतानाची विडियो पाहिली असेल,  त्यात पक्षी रडत आहेत , जसा एखाद्‌या मनुष्याचा निवारा गेल्यावर माणूस रडतो तसाच कोणताही संवेदनशील माणूस की परिस्थिती पाहून निराश होईल. हैद्राबाद युनिवर्सिटीची ४०० एकर जागा तेलंगणा सरकार लिलावात काढण्यास उत्सुक आहे, कशासाठी तर आय.टी. पार्क बनविण्याचा त्यांचा मानस आहे. ४०० एकर जागा ही काही छोटी मोठी गोष्ट नाही. दक्षिण भारतातल्या लोकांकडे आपण सरसकट सुशिक्षित राज्यं ,लोकं म्हणून पाहतो, पण ही काही तशी लक्षणं दिसून येत नाहीत.युनिव्हर्सिटीचे शिक्षक, कर्मचारी, विदयार्थी पर्यावरणवादी बरेच दिवस आंदोलन करीत आहेत पण त्यांच्यावर देखील धोपटशाही चालू आहे. बुलडोजर्स आपले काम चालूच ठेवत आहेत . तेलंगणा सरकारचं म्हणणं असे आहे कि या वनात वाघ,हरीण,इ प्राणी अस्तित्वात नाही आहेत पण हैदराबाद यूनिवर्सिटीच्या एका संशोधनाच्यामते तिथे ७००हुन अधिक फूल झाडांच्या प्रजाती,  सस्तन प्राण्यांच्या १० प्रजाती, १५ सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजाती व २०० पक्षांच्या प्रजाती आहेत आणि त्याहून अधिक ते आपला राष्ट्रिय पक्षी मोर याचा अधिवास आहे , तेलंगणा सरकारने येणाऱ्या शनिवार, गुढीपाडवा, रमजान ईद अशा सलग तीन सुट्‌ट्यांचा आपला इप्सित साध्य करण्यास वापर केला कारण कोर्टाला सुट्टी होती आणि  ह्यावेळेत जे नुकसान व्हायचं ते होऊन गेलं होते आणि जरी कोर्टचे आदेश आले असले तरी झाडं तोडण्याचे काम चालूच आहे कारण कायदेशीररित्या जागा राज्य सरकारची आहे पण काही एक नैतिक जबाबदारी देखील असते.आपल्या राजकारण्यांना, बड्‌या अधिकारांना विकास हवा आहे जो युरोप व तत्सम प्रगत देशांना लाजवेल, त्यांचे रस्ते, बिल्डिंग्ज, रोजगार पण त्याच बरोबर त्यांच्या राष्ट्रीय वनांची निसर्गाची, नैसर्गिक स्थानांची देखील ते जपणूक करीत असतात. भारत शहरीकरणावर जोर देत असताना दुसरीकडे आपल्या देशाला हवामान बदलामुळे जास्त धोका आहे आहे, याचा देखील आपण विचार केला पाहिजे. प्रत्येक वर्षी हिट वेव्ह येते, प्रत्येक वर्षी शहरं तुंबतात, आपण आंधळे तर झालो नाही आहोत ना?आपलं एका वोटमुळे ह्यांना सुरक्षा कवच मिळत आहे का? ह्यांचा स्वार्थ साधण्यासाठी.....आणि आय.टी पार्क डोंगरावर कोण बांधतं हा पडलेला प्रश्न..मध्यरात्रीच्या सुमारास लाकडांची वाहतुक केली जाते याची विडियो पाहिली त्याचे पुढे काय होते, विक्री होते का तस्करी होते कि सरकारचा फर्निचरचा धंदा आहे???
 यूनिवर्सिटीची २३०० एकर जागा त्यातील १५०० एकर वापरण्यास उपलब्ध आहे त्यातील ४०० एकर वर निसर्गाच शोषण  करण्याचा पुरेपूर बेत आखाला आहे...आपल्याला जाणीव आहे कि आपला स्वार्थ, हस्तक्षेप वाढला कि निसर्ग आपला हाहाकार दाखवतो, पक्षी व प्राण्यांचे अश्रू वाया जाणार नाहीत. आपण निसर्गासमोर नगण्य आहोत,  हे जग फक्त माणसांचे नाही हे लवकरात लवकर आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्याला आता लक्षात येत असेल नॅशनल प्रॉब्लेम कॉमेडी झाली आहे आणि कॉमेडी नॅशनल प्रॉब्लेम झाली आहे, अश्या काळात हा मुद्दा तर दूरचाच... अतुल कुलकर्णी ह्यांचं परवाच एक वक्तव्य आहे "चांगल्या भविष्याची खात्री देता येत नसली कि अप्रासांगिक भूतकाळ खोदायला प्रवृत्त केलं जातं."
हे सगळे घडत असताना एक कविता आठवते -

 *सुना है जंगलों का भी कोई दस्तूर होता है*
*सुना है शेर का जब पेट भर जाए तो वो हमला नहीं करता*
दरख़्तों की घनी छाँव में जा कर लेट जाता है
हवा के तेज़ झोंके जब दरख़्तों को हिलाते हैं
तो मैना अपने बच्चे छोड़ कर कव्वे के अंडों को परों से थाम लेती है
सुना है घोंसले से कोई बच्चा गिर पड़े तो सारा जंगल जाग जाता है
सुना है जब किसी नद्दी के पानी में बए के घोंसले का गंदुमी रंग लरज़ता है
तो नद्दी की रुपहली मछलियाँ उस को पड़ोसन मान लेती हैं
 कभी तूफ़ान आ जाए, कोई पुल टूट जाए तो किसी लकड़ी के तख़्ते पर 
गिलहरी, साँप, बकरी और चीता साथ होते हैं सुना है जंगलों का भी कोई दस्तूर होता है. ख़ुदावंदा! जलील ओ मो'तबर! दाना ओ बीना! मुंसिफ़ ओ अकबर!
मिरे इस शहर में अब जंगलों ही का कोई क़ानून नाफ़िज़ कर!*
P- झेहरा निगाह


 - अजिंक्य रोकडे (देवा) #बाकी आलबेल

Comments

Popular posts from this blog

उभे असू जिथे, तिथे नवीन परीक्षा द्यायला🖤💫

           एक मोकळं माळरान आहे आणि मध्ये एकटंच झाड उभं आहे, पाठीमागे सूर्य मावळतोय, मस्त छटा दिसत आहेत, काही ढग काळे आहेत, काहींना सोनेरी कडा आहे. खाली जमीन तांबडी, तडे गेलेली. वाळलेल्या काड्या, जमवली तर फाटी जमतील गोयलाभर . सगळं शांत. पण त्या शांततेत एक कोलाहल पण जाणवतो आजकाल.... हुबेहूब वाटावं असं वातावरण.... आपण जन्माला येतो तेव्हाच पहिली परीक्षा सुरू होत असते, रडलास का नाही? श्वास घेतलास का नाही? वजन किती? पहिल्या दिवसापासून आपल्याला मोजलं जातं, तोललं जातं. मग शाळा सुरू होते. पाटी-पेन्सिल, दप्तराचं ओझं, आणि मार्कांचं टेन्शन. दहावी म्हणजे आयुष्याचा टर्निंग पॉइंट. बारावी म्हणजे करिअरचा पाया. CET, नोकरीसाठी इंटरव्ह्यू, पैसे, व्यापार....पेपर संपतच नाहीत, आयुष्याचा पेपर कधी पुढे पुढे सरकत जातो समजतच नाही...    पण खरं सांगू? हे सगळे पेपर सोपे होते. कारण त्यात प्रश्न छापलेले असायचे. चार पर्याय असायचे. वेळ ठरलेली असायची. पास-नापासचा निकाल ठरलेला असायचा. पण इतर बितर चे प्रश्न आपण दूर लोटत जातो आणि खरी परीक्षा तेव्हा सुरू होते जेव्हा उत्तरप...

अनामिक🌼

     त्यादिवशी नाक्यात गेलेलो , फॉर्म भरला , ५००० जागा आणि एक माझी पोस्ट ह्या आशेवर , ओबीसीला ह्यावेळी जोराच माप मिळालं म्हणावं , सकाळपासून आहे इथेच भूक अनावर होत होती , वडापाव खात होतो पण कोणीतरी ओळखीचं आजू बाजूने जातच असत पण काही वेळा वेगळे भास होतात , तस पण सगळे हवं हवं असणार दृश्य शोधत असतात , मी कॉलेज वरून , कामावरून येणाऱ्या , मुली ,  स्त्रिया दिसतात का पाहायला नजर इकडे तिकडे केली , हो म्हणूनच , एक मुलगी जणू एवढ्या पावसात पण पाय घाण न होता चालत होती  , माझी नजर तिच्या पायांवर गेली , पैंजण होतं , पदवी शिक्षण झालं असेल , माझ्या वयाची आहे , पाय गोरे आहेत , सुंदर असणार , इतक्या अलगद कश्या चालू शकतात ह्या मुली , मला तर पाय साफ ठेऊन गाडी पण चालवता येत नाही , जन्मतः मुली अश्याच असतात का , किती काळजी घेतात स्वतःची , मी वर पाहिलं तर आखीव रेखीव शरीर , चेहरा गोलच , हो गोलच होता , एकंदरीत केस पण छान होती , मला छोटी केस आवडत नाहीत आणि आवडली तर पूर्ण बोबकट असावा , डोळे तिच्यावर स्थिर केले आणि तिने पण माझ्याकडे पाहिलं , मी चावा घेतला वड्यावर आणि नेमकं तेव्हाच हिने मला पह...

तुला कोड्स मध्ये शोधेन म्हणतो 🩶

उन्माद संपून जाईल तेव्हा  खरे उरतील सकल जण  पण त्याविन मग काय उरेल  जमिनीत काय उगवेल  आणि कोण काय पुरेल  घरी काही,  कुणाला न बोलता येऊन दाखव  कुणाचा ना रुसवा घेऊन ये  न कुणाला दिसता फिरून दाखव  एक दिवस कुणाची शपथ न घेता ये  ये असाच कधीतरी रिकामे रिकामे सागर भर  टेबलाचे वेगळे वेगळे परिप्रेक्ष दाखव  दाखव माणसाची उत्क्रांती कशी झाली  किती मिथकं आणि किती गोष्टी लयास गेल्या  उरले सुरले कसे सावरले  आवरले आणि आवरून कसे माजले सारे  एकजात कसे  वातावरणीय ढोबळ मनाने अंदाज बांध  महामारीवर रडलास तसं युद्धावर रडून दाखव  फोड खापर असंख्य गोष्टींवर जगावर  नाहीतर नाही तर, तारे आहेत लुकलूकतात  त्यांची उत्पत्ती बोल  ठिपका आहोत आपण असे मार एक एक  झोपी जाऊन पुन्हा ये ग्लिच बनून मित्रा  तुला कोड्स मध्ये शोधेन म्हणतो.....