Posts

Showing posts from October, 2021

बोल रंग हवेत तुला🖤

Image
बोल रंग हवेत तुला सतरंगी चुतिया मी रडीचा भाव विचार तो भाव मी तापाचा पारा मी बेधुंद वारा मी   बाटलीत बंद गारा मी तुझ्या मिठीत दुसऱ्याने फुलवलेला शहारा मी बोल साथ हवीय तुला मी व्यापाचा व्यापारी व्यापात मी तू अनभिज्ञ  एक वर्ष दोन तीन तू समज मला मिन  गळात अडकलेला मीन मी  मी अनसीन  मी ब्लॉक मी तुझा ट्रोल न वाचता  लव्ह देऊन स्क्रोल मी त्यात खुश पण एक स्वप्न  स्वप्नातला राजा  राजांचा राजा राजा चक्रवर्ती मी समुद्रं जर माझी तर तू काय चीज तू पण माझी बुरमुस टोचते  सत्याची खाज  खाज मिटली की  माझा मी उरतो उरलो मी उरलेला मी अजिंक्य रोकडे

भाषेचं काय...

Image
भाषेच काय शुद्ध वाणी दुष्काळी भागात बोरिंगचं पाणी भुकेला कसली भाषा हाय ब्रिंजल काय आणि वायंगा काय एकच भाजी आयेने विळ्यावर घेतली  भाषेची जागा भुकेने घेतली बस्स का भैय्या  पठारावर बोलला कोकणात बोलला  हट्ट साला भैया साईडला घेऊन कोलला कोकणातली माणसं शहळ्यांनी भरली पठारावरची लाव्यावर तरली भाषेच काय शुद्ध वाणी दुष्काळी भागात बोरिंगचं पाणी भूमीपुत्रांची माती  एस यु वी च्या चाकाला पेट्रोलचे दर  शेम्बुड आपल्या नाकाला भाषेच काय शुद्ध वाणी दुष्काळी भागात बोरिंगचं पाणी पाण्याला विहीर  विहिरीला मोटर आमचा तो नाला तुमच ते गटर हेल तुझा चुकला  आता झाला राडा  भाषा बघ त्याची भाषेच काय शुद्ध वाणी दुष्काळी भागात बोरिंगचं पाणी अजिंक्य रोकडे

तथागता सारखा प्रवास जमला पाहिजे राव😌

Image
स्थित्यंतरे नको वाटतात , जैसे थे ची भूमिका किती सुखावह वाटते , प्रवास वेगात घडतो , वाचन , गाणी , कव्हर सोंग्स नाहीतर अभ्यास , अगदीच काही नाही तर गर्दीचं वाचन , केसांचे रंग , पेहराव , अंगकाठी , स्वभाव , शिव्या , आवाजातील हेल , राग , लोभ , प्रेम किंवा जास्तीत जास्त स्वार्थ…. घरी असणं , स्वतःबद्दल लिहिणं , स्वतःची लाल करणं , स्वतः खच्ची होणं , सर्व ठीक असत पण प्रवास आला की वेग आला , वेगाला नसतात थेहराव , गाडी पुढे जात असते , आपण पाहत बसायची मागे जाणारी झाड , डोंगर , माकडं , धड काही पाहता ही येत नाही … दगडं सारखीच वाटतात, त्यांना आपण रिलेट होतो , प्रकार बदल आपल्याला करता येत नाहीत , आपल्या हातात नाही , मोसमी कारणं एकतर मुलामे तरी चढवतात नाहीतर आकार तरी देतात , प्रवासात न कमावलेले पैसे पण खर्च होतात , मंदिरांना पाहून कौल पण लावता येत नाहीत मध्ये येत असतो तो वेग , घाटात मंदावतो , पण तेव्हा एकतर दरी पाहता येते नाहीतर डोंगर , हेच तर आवडत नाही ,अशीच परिस्थिती का नेहमी ? निवड !! का करायची निवड आणि एकच का ?? प्रवासात पाणी पण विकलं जात , बारमाही परा आठवतो , रगील असलेले मिनरल आठवतात … आ

अशी मुद्रा बनव...🤡

Image
    अशी मुद्रा बनव की त्या मुद्रेत तुझ्या शरीराला आराम मिळेल , मनाची बेचैनी स्थैर्य गाठेल , शक्य असेल तर डोळे मिटून घे काही क्षण , शरीर थकलं आहे म्हणून झोपणं सोडून दे , डोळे बंद होत आलेत म्हणुन झोपणं सोडून दे , झोप एकदा स्वतःसाठी निवांत , शांत आणि मर्जीने स्वतःच्या इंद्रियांना तुझी वाहवा करण्याची संधी दे …..        एकांताचा शोधात अजून नवीन ओळखी होतील तेव्हा अजून तळमळ वाटेल एकांतात राहण्याची  , तेव्हा मुद्दाम लोक येतील तुझे हाल किंवा जास्तीत जास्त खुशाली विचारण्यास तेव्हा मात्र हसून उत्तर दे , वाटेल नवीन जग वसाववं , तुझे नियम , तुझ्या अटी आणि तुझ्या योजना राबवाव्यात पण निरस होईल जगाचे नियम समजवून घेताना , तेव्हा जाणीव होईल तू ही हिस्सा आहेस ह्या साऱ्याचा , सृष्टीच्या गाड्याचा , जगाच्या गुपिताचा , पुस्तकातील पात्रांचा , आरश्यातील स्वतःच्या प्रतिबिंबाचा , कुणी तुला वेगळा म्हणाला तर तुझी खेचत आहे समज , शहाना हो आणि जमिनीवर रहा , शेवटी काय तीच माणसं , तेच कुटुंब , तोच स्वभाव आणि तेच जग….       

उरलो कथेत , कवितेत

Image
आठवतंय का तुला ओळख करून दिली नुसरत सोबत तू रिलेट होत होत मग मी दूर गेलो आठवतंय का ओळख करून दिली  फैज सोबत तू आणि मी  हम देखेंगे पाहत होतो आठवतंय का गुलजार ऐकला  हेडफोन एक ए जिंदगी गले लगाले  आपण हातच दिले हातात आठवतंय का  तेहजिब बोलला  उसी जगह पर जहाँ कई रास्ते मिलेंगे  पलट के आए तो सबसे पहले तुझे मिलेंगे आता नाही आठवणार तुला आठवतंय का आपण भेटलो जॉनला जॉन बोलला  वक्त बुरा था आप तो अच्छे रहते नसेल आठवत कारण तो जॉन होता सगळं आता नसेल आठवत तेहजिब आणि जॉन लोकं ऐकत नाहीत नाही आठवणार बघ आठवतंय का  मी सगळं ऐकवलं  दाखवलं सुनावलं  तू आणि मी कथेत कवितेत उरलो ते माझ्यासोबत आहेत अजिंक्य रोकडे

गुडूप व्हावं लागतं...😌

Image
वारसा व्हायला  आधी गुडूप व्हायला लागतं उदरात आज गेलेलं  खोदतील तेव्हा  रक्त मिळेल  का कार्बनच जास्त मिळेल उकरून उकरून  अस काय उकरतो आपण भूतकाळ  इतिहास  मढी काय निकष असतील तरी किती सापळ्यांचा ढीग लागतो स्टेनलेस स्टीलची भांडी लागतात का मदरबोर्ड पण चालतील  संस्कृती आणि खाद्य  पेटित ठेवलेल  रेशनकार्ड पाहून समजतील डब्यात तांदूळ करंड्यात कुंकू देवळात देव सगळं इथेच असेल निकष असे काय आहेत जागतिक व्हायचे   व्यापारावर चलनावर  देवावर मूर्तीवर चित्रावर  की फक्त गुडूप होण्यावर की वारसा व्हायला  आधी गुडूपच व्हायला लागतं अजिंक्य रोकडे.....

रिलेट होणं बंद होतंय...

Image
    आता आता गाणी रिलेट होत नाहीत , बदलून बदलून इच्छा मरते , गाणी ऐकण्याची , मग नुसतं म्युसिक मिळतं का पाहायचं , कधी बासरी , कधी तबला वगरे , एखादा ट्रान्स ज्यात काहीच नसेल फक्त म्युसिक , शब्द आले की एकत्र रिलेट होतं नाहीतर नाही होत , नको वाटतं ते गाण्यात बुडून रिलेट होणं…       सुरूवात ह्याची आठवी मध्ये झालेली , मित्राकडे रेडिओ होता , त्यावर " ओये राजू प्यार न करना " , " इश्क न करना " , " वो लड़की बहुत याद आती है " लागायचे , मला फार आवडायची ती गाणी , वडिलांनी बटन स्लाईड होऊन खाली येणार नोकियाचा मोबाईल घेतला , टीव्ही होती त्यावर दूरदर्शन वर जुनी गाणी लागायची " मै ही मैं हु " ,  " कौन है जो सपनो में आया " जाम भारी गाणी , किशोर सर , रफी सर आणि मुकेश सर , समजायचं काही नाही जास्त पण मज्जा यायची , लिरिक्स असावे तर असे , पण त्या सुरूवातीच्या ४ ५  मिनिटाच्या म्युसिकचा कंटाळा यायचा , 9XM घरात लावणं म्हणजे विचित्र / संस्कारहीन असल्यागत समजलं जायचं , घरातल्या त्या मोबाईलला रेकॉर्डर होता , रेडिओची गाणी , लग्नात वाजणारी       "रेतीवाला नवरा"

अनामिक🌼

Image
     त्यादिवशी नाक्यात गेलेलो , फॉर्म भरला , ५००० जागा आणि एक माझी पोस्ट ह्या आशेवर , ओबीसीला ह्यावेळी जोराच माप मिळालं म्हणावं , सकाळपासून आहे इथेच भूक अनावर होत होती , वडापाव खात होतो पण कोणीतरी ओळखीचं आजू बाजूने जातच असत पण काही वेळा वेगळे भास होतात , तस पण सगळे हवं हवं असणार दृश्य शोधत असतात , मी कॉलेज वरून , कामावरून येणाऱ्या , मुली ,  स्त्रिया दिसतात का पाहायला नजर इकडे तिकडे केली , हो म्हणूनच , एक मुलगी जणू एवढ्या पावसात पण पाय घाण न होता चालत होती  , माझी नजर तिच्या पायांवर गेली , पैंजण होतं , पदवी शिक्षण झालं असेल , माझ्या वयाची आहे , पाय गोरे आहेत , सुंदर असणार , इतक्या अलगद कश्या चालू शकतात ह्या मुली , मला तर पाय साफ ठेऊन गाडी पण चालवता येत नाही , जन्मतः मुली अश्याच असतात का , किती काळजी घेतात स्वतःची , मी वर पाहिलं तर आखीव रेखीव शरीर , चेहरा गोलच , हो गोलच होता , एकंदरीत केस पण छान होती , मला छोटी केस आवडत नाहीत आणि आवडली तर पूर्ण बोबकट असावा , डोळे तिच्यावर स्थिर केले आणि तिने पण माझ्याकडे पाहिलं , मी चावा घेतला वड्यावर आणि नेमकं तेव्हाच हिने मला पहावं , कस वाटलं असेल तिला

कॉन्शनट्रेशन कॅम्प

मी कॉन्शनट्रेशन कॅम्प मध्ये असतो तर  श्वास मोजले असते खिडकी म्हणजे स्वातंत्र्य  बोललो तर श्वास निष्पर्ण  मी बोलणार नाही हुकूमशाही  लोकशाही  मी श्वास वाचवणार मी असा अलेबल राहणार मित्र बनवणार विरोधक पटवणार लव्ह देणार रीऍक्ट होणार पटलं ते घेणार  न पटलेलं कोलणार तुझ्या व्याख्या खोडून काढणार  मी उंट तू त्याचा द्वार मी पाईक तू उंटावर स्वार असो फरक नसो काही फरक दिसला की  माझा पेन उठतो उठला पेन माझा  मग रेष मारूनच सोडतो जी द्याल शाही त्या शाहीचा पाईक बनिन  पण तू चुकलास  तर शब्दांनी जोरात हानीन…

मी ओरबडणार नाही...

मी ओरबाडणार नाही तू पाहत रहा काही नको  बोलत रहा जगाचं काय  नात्याला नाव उर्फ़ट्या भावनांना  अफवांचं नाव माझी अशी ओळख तुझी इज्जत असा पुरुषार्थ  आणि तशी बाई स्पर्श नको पण  ओकून बोल मी बोलेन लाईफ तू घाबरून दुःख तोल जज होशील तू कधी मी व्याख्या तुझ्या  व्याख्या माझ्या समाजाचा  अजून ठरल्या नाहीत जेव्हा ठरतील तेव्हा  ठरवू तू कोण मी कोण तुझं नातं  माझं नातं नावं देऊ….

ताफा

आभासी प्रतिमेला  माणसाच्या छिनाल नजरेचे मैथुन मिळाले  सत्य नग्न झाल्यावर  सर्व धायमोकलून पळाले ताफा पुढे मात्र थांबला  नेत्राच्या सुखाचे डोहाळे पुरविण्यास  नजारा मात्र खिन्न होता   त्यांना निर्मळ प्रेमाने रिजवण्यास गाव लागले सभ्यतेचे  म्हणून सावरून घेतले सदरे  गलिच्छ अश्या रस्त्याचे  अंत होते साजिरे गावात फिरताना बाता रंगल्या  परंपरेच्या  मनात मात्र मुर्त्या भंगल्या नग्नतेचा मग कळून चुकले ताफ्याला  सदरे गावाचे पण चुरघळलेले  लाजेने केला प्रतिरोध नाहीतर  आत्मे सर्व सडलेले अजिंक्य रोकडे ( देवा )  ९/७/२०२०

उणिवांचा बाजार

उणीवांच्या बाजारात अभिनय करत व्यव्हार्य अस काहीतरी साठंलोठं करून स्वतःवर अभिमान कर , चांगलं वागून झालेल्या नुकसानाची भरपाई मागू नकोस , व्यहारावरून , देण्याघेण्यावरून युद्ध झाली आहेत जगात , ती मढी आता उकरत बसू नकोस , तू पुनण्याची गणना कोण करी म्हणून चालत रहा , तुला अशी काही भीती वाटून देऊ नकोस की कुठे ह्या साऱ्याचा हिशोब होत असेल , हिशोबाची चिंता केलीस तर , आकडे मागे लागतील , ते आकडे मग तुला स्वभाव दाखवू लागतील , मग ते स्वभाव तुला त्रास देऊ लागतील आणि मग तू त्रासाला कंटाळून उदास होशील म्हणून , कच्चा रहा गणितात , हिशोब मांडू नकोस , येत असला तरी ….       कुणी आपला अपमान केला तर त्याच्या मरणाची चिंता तू वाहू नकोस , तुझा जगण्याने काही फरक नसला पडत जगाला तरी जग , भविष्यात लुप्त झालेली संस्कृती शोधत असतील तेव्हा तुझा सांगाडा ,  आंनदी आणि दीर्घायु मानवाचे अवशेष म्हणून मागे राहिला पाहिजे , देऊळ मध्ये जसा ठिपका बनायला सांगतात अण्णा तसा रहा , तुझा केश्या होऊदेत , पिंजरा मधील मास्तर होऊदेत , मशाल मधील विनोद कुमार होऊदेत , सामना मधला मारुती कांबळे होऊदेत , तू असाच रहा केओस मध्ये मज्जा घे …..      

कधी तू , कधी मी !

जगातील पहिली दोन भिन्न लिंगी माणसं जेव्हा भांडली असतील तेव्हा त्याचं कारण भूक असेल नाहीतर जास्तीत जास्त विचार केला तर प्रेम असेल , पण जेव्हा ती एकामेकांचा सहवासात किंवा स्पर्शात आली असतील तेव्हा मात्र सर्व विसरून एकरूप झाले असतील तेव्हाच तर तु वाचणारा आणि मी लिहणारा असेन , उद्या तू लिहीत असशील मी वाचत असेन बहुतेक ……         ताफा भुकेचा कुठे न्यायचा आज शिकारीला , हे कोण सांगणार किंवा कोण ठरवणार ह्यावरून पहिला वाद झाला असेल ना तेव्हा कुठेतरी आजच्या राजकारणाची किंवा आजच्या लोकशाहीची , ठोकशाहिची सुरुवात झाली असेल , तेव्हा कुठे तू उभा राहतो आणि मी मतदान करतोय , नाहीतर तू मतदान करतोय मी उभा राहतोय , तू हुकूम देतोय मी सलाम करतोय आणि काहीसं vice versa ….       कुठेतरी झाडाखाली चिमण्या हागल्या तेव्हा झाडं आली नवीन पालवी फुटली , तुझ्या माझ्या सारख्या कुणाला तरी शेतीची संकल्पना सुचली आणि आज तू पण उपाशी नाही आणि मी पण नाहीय , अपवाद उपाशी आहेत … म्हणून तर आज तू शेतकरी आणि मी  खातोय , तर कधी मी शेतकरी आहे आणि तू खातोय…….. हमीभावासाठी आंदोलन पण करतोय ….         कुणीतरी गोल दगड फिरवला एकांताचा विट येऊ

गावातला परा

       गावातला परा गावभर रेघोट्या मारत कनेक्टेड असा फिरत राहतो , लहानपणी नव्हे आता पण विचार येतो हे डिजाईन केलेलं असेल का कोणी ही गावं वसवताना , आता गावाची संस्कृती ह्या पऱ्याकाठी येऊन वसली असा विचार आला तरी हसू येणारच , तर परा म्हणजे बायका वरच्या अंगाला कपडे धुतात , तर खालच्या अंगाला लोक हागायला जायचे आता नाही जात , आता घरोघरी झालेत शौचालय …        आमच्या लहानपणी पण ज्या पऱ्यासंबंधी कथा होत्या तश्या अजून आहेत हे आताच्या लहानपोरांकडून मला कळलं , आमच्या वेळी अश्या अफवा की तेथे हडळ असे , त्या पऱ्यात एक मोठा साप आहे , एकटा माणूस जाऊ नाही शकत , पिलेल्या आणि नागड्या माणसाला काही धोका नाही , थोडं समजायला लागलं तेव्हा जाऊ पण लागलो आम्ही खाली , एकदा आम्ही तिथे कबुतरांसाठी छत्रीचा तारांची फासकी लावली त्यात पोपट भेटला , त्याला घरी आणलं पण ठेवायच कशात पिंजरा नाही मग उंदराचा पिंजऱ्यात त्याला ठेवलं , त्यावर कापड टाकलं , मस्त झोप लागली मला  , पण सकाळी तो तारा वाकवून गायब , जाम बेकार वाटलं , ब्रेकअप झाल्यावर एवढं दुःख होउ शकत नाही तेवढं मला झालेलं तेव्हा , खूप सारे कबुतर पकडले होते , त्यांना बांधून ठ

गाडीखाली मार्क्स आला

Image
गाडीखाली कार्ल मार्क्स आला… उजव्या बाजूने जायला हव्या होत्या त्या गाड्या , मला घासून रॉंग साईडने येऊ लागल्यात ,  पाहतो तर उजव्या बाजूला , कामगार भैय्ये , रस्त्यावर ,  भुकेची , वासनेची , जोरूची चर्चा करत होते , डोक्यात सनक गेली ,  अरे एक साईड पकड के खडे रहने का ??? त्यातल्या एका कार्लने कडक नजर फिरवली ,  माझीच फाटली , झाट्याचा भूमिपुत्र तू ,  तो खंडला आणि स्वप्न जगला ,  त्याने ते तरी केलं ,  तू बापाच्या गाडीवर फिरून , एक साईडच तत्वज्ञान सांगतो ,  त्यांच्या साईड सेफ आहेत ,  बायकोला मनी ट्रान्सफर होतो ,  आईच्या गुढघ्याला तेल जात ,  तू फुकट खातो , स्पोर्ट बाईक वरून साईड ठरवतो ,  नजरेत त्यांनी माझी मारली , त्याचा नजरेत मला डांगे भेटला , पुढे कचकन ब्रेक मारला , गाडीखाली मार्क्स आला….

झरा

Image
तुझ्या माझ्या आठवणी , झऱ्यात पाहतोय…. वाहत्या पाण्यात , एक महाकवी राहतोय… वाहताना तू , जाताना तू , दिला दगडाला आकार…. स्तब्धतेचा पुतळा मी , तुझा इथे थांबण्यास नकार…. मी निमुळता झालो क्षणोक्षणी , जादू तुझ्या स्पर्शाची… मी भिजत झीजत राहिलो क्षणोक्षणी , गाथा ही आयुष्याची… रात्री येईन म्हणतो ह्या झऱ्यावर , झरा चांदणे कोंदुन घेईल.. पहाट होता होता , कथा पैलतीरास नेईल.. अजिंक्य रोकडे