Posts

Showing posts with the label चिपळूनपूरपरिस्थिती महापूर

आमच्या बाळाचा पहिला प्रवास..

Image
आमच्या बाळाचा पहिला प्रवास..... चिपळूणच्या पुराने आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागृतता आवश्यक असल्याचे अधोरेखित केले आहे. यासाठी खूप काही अभ्यासिकाची आवश्यकता नाही. आपल्या दैनंदिन व्यवहारातील छोट्या छोट्या बाबींचा बारकाईने विचार केला तरी खूप आहे. फक्त आपत्ती कडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन महत्वाचा आहे. मी आणि माझी पत्नी पायल आम्हाला आलेला अनुभव. आमच्या बाळाच्या जन्माची संभाव्य तारीख होती २० जुलै. पावसाचे दिवस असल्याने सहाजिकच काळजी वाटत होती. आपली वेळेला घाई गडबड होऊ नये म्हणून हॉस्पिटलला जाताना लागणारी बॅग पायलने एक महिना आगोदर भरून ठेवली होती. आठवेल तसं आणि परिस्थिती कशी असू शकते याचा विचार करून त्यात वस्तू भरत होती. सीझर झालं तर पाच सहा दिवस राहण्याची तयारी, वगैरे.  *सुवर्ण क्षण आणि यक्ष परीक्षा* आमच्या बाळाचा जन्म २० जुलै ला सुश्रुषा हॉस्पिटल, चिंचनाका, चिपळूण येथे झाला, फार मोठा आनंदाचा क्षण, त्यामध्ये दिवस आषाढी एकादशीचा, कोणत्याही मराठी व्यक्तीसाठी यापेक्षा विशेष दिवस तो कोणता! सम्पूर्ण दिवस शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. सामान्य प्रसुती झाली आणि दोघेही सुखरूप याचे खूप समाधान