Posts

Showing posts with the label poem

उरलो कथेत , कवितेत

Image
आठवतंय का तुला ओळख करून दिली नुसरत सोबत तू रिलेट होत होत मग मी दूर गेलो आठवतंय का ओळख करून दिली  फैज सोबत तू आणि मी  हम देखेंगे पाहत होतो आठवतंय का गुलजार ऐकला  हेडफोन एक ए जिंदगी गले लगाले  आपण हातच दिले हातात आठवतंय का  तेहजिब बोलला  उसी जगह पर जहाँ कई रास्ते मिलेंगे  पलट के आए तो सबसे पहले तुझे मिलेंगे आता नाही आठवणार तुला आठवतंय का आपण भेटलो जॉनला जॉन बोलला  वक्त बुरा था आप तो अच्छे रहते नसेल आठवत कारण तो जॉन होता सगळं आता नसेल आठवत तेहजिब आणि जॉन लोकं ऐकत नाहीत नाही आठवणार बघ आठवतंय का  मी सगळं ऐकवलं  दाखवलं सुनावलं  तू आणि मी कथेत कवितेत उरलो ते माझ्यासोबत आहेत अजिंक्य रोकडे

गुडूप व्हावं लागतं...😌

Image
वारसा व्हायला  आधी गुडूप व्हायला लागतं उदरात आज गेलेलं  खोदतील तेव्हा  रक्त मिळेल  का कार्बनच जास्त मिळेल उकरून उकरून  अस काय उकरतो आपण भूतकाळ  इतिहास  मढी काय निकष असतील तरी किती सापळ्यांचा ढीग लागतो स्टेनलेस स्टीलची भांडी लागतात का मदरबोर्ड पण चालतील  संस्कृती आणि खाद्य  पेटित ठेवलेल  रेशनकार्ड पाहून समजतील डब्यात तांदूळ करंड्यात कुंकू देवळात देव सगळं इथेच असेल निकष असे काय आहेत जागतिक व्हायचे   व्यापारावर चलनावर  देवावर मूर्तीवर चित्रावर  की फक्त गुडूप होण्यावर की वारसा व्हायला  आधी गुडूपच व्हायला लागतं अजिंक्य रोकडे.....