उन्माद संपून जाईल तेव्हा खरे उरतील सकल जण पण त्याविन मग काय उरेल जमिनीत काय उगवेल आणि कोण काय पुरेल घरी काही, कुणाला न बोलता येऊन दाखव कुणाचा ना रुसवा घेऊन ये न कुणाला दिसता फिरून दाखव एक दिवस कुणाची शपथ न घेता ये ये असाच कधीतरी रिकामे रिकामे सागर भर टेबलाचे वेगळे वेगळे परिप्रेक्ष दाखव दाखव माणसाची उत्क्रांती कशी झाली किती मिथकं आणि किती गोष्टी लयास गेल्या उरले सुरले कसे सावरले आवरले आणि आवरून कसे माजले सारे एकजात कसे वातावरणीय ढोबळ मनाने अंदाज बांध महामारीवर रडलास तसं युद्धावर रडून दाखव फोड खापर असंख्य गोष्टींवर जगावर नाहीतर नाही तर, तारे आहेत लुकलूकतात त्यांची उत्पत्ती बोल ठिपका आहोत आपण असे मार एक एक झोपी जाऊन पुन्हा ये ग्लिच बनून मित्रा तुला कोड्स मध्ये शोधेन म्हणतो.....