Skip to main content

Posts

Showing posts from December, 2021

तू दिलेला वेल

 बघ तू दिलेली वाढली आहे गणेशवेळ तू म्हणतेस तसाच मी पण तो पण आलबेल आधाराशिवाय मी आलबेल नाहीतर नशिबाचा खेळ मेहनतीला तसं कसलं तरी ग्रहण माव आणि जखमेचे व्रण बघ तू दिलेली वाढली आहे गणेशवेळ तू म्हणतेस तसाच मी पण तो पण आलबेल प्रेम की वासना ठरव  तीच बाराखडी फिरव आतली मस्ती जिरव हिर रांझा , लैला मजनू गिरव बघ तू दिलेली वाढली आहे गणेशवेळ तू म्हणतेस तसाच मी पण तो पण आलबेल तुला शायरीत रमवीण  तुला आकाशात फिरविण अशी तशी सगळी स्वप्न पाहीन गेलीस तू की एकटा राहीन बघ तू दिलेली वाढली आहे गणेशवेळ तू म्हणतेस तसाच मी पण तो पण आलबेल एकटा असलो की सुचतं शाही गडद होते सगळं रुचतं एकटा म्हणजे एकाकी  शेवटी कसं आलबेल असतं बाकी बघ तू दिलेली वाढली आहे गणेशवेळ तू म्हणतेस तसाच मी पण तो पण आलबेल अजिंक्य रोकडे ( देवा )