तू दिलेला वेल

 बघ तू दिलेली वाढली आहे गणेशवेळ

तू म्हणतेस तसाच मी पण तो पण आलबेल


आधाराशिवाय मी आलबेल

नाहीतर नशिबाचा खेळ

मेहनतीला तसं कसलं तरी ग्रहण

माव आणि जखमेचे व्रण


बघ तू दिलेली वाढली आहे गणेशवेळ

तू म्हणतेस तसाच मी पण तो पण आलबेल


प्रेम की वासना ठरव 

तीच बाराखडी फिरव

आतली मस्ती जिरव

हिर रांझा , लैला मजनू गिरव


बघ तू दिलेली वाढली आहे गणेशवेळ

तू म्हणतेस तसाच मी पण तो पण आलबेल


तुला शायरीत रमवीण 

तुला आकाशात फिरविण

अशी तशी सगळी स्वप्न पाहीन

गेलीस तू की एकटा राहीन


बघ तू दिलेली वाढली आहे गणेशवेळ

तू म्हणतेस तसाच मी पण तो पण आलबेल


एकटा असलो की सुचतं

शाही गडद होते सगळं रुचतं

एकटा म्हणजे एकाकी 

शेवटी कसं आलबेल असतं बाकी


बघ तू दिलेली वाढली आहे गणेशवेळ

तू म्हणतेस तसाच मी पण तो पण आलबेल



अजिंक्य रोकडे ( देवा )




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

महत्वाच काहीतरी

तुझ्या दोन्ही त्या उरोजांनच्या मधोमध 🌼

आपण गिनतीतच न्हवतो 🌼