असं पण म्हणतात

तू अंतर्यामी आहेस माहीत आहे

असं म्हणतात

असं पण म्हणतात

तू सकाळ उगवतो

तू रात्र जागवतो

भूक भागवतो

तू डोहाळे देतो सुखाचे

तुझे आभार मानायचे

असं देखील म्हणतात

म्हणतात आकाशात तारे

आपण गोल फिरत असतो

चंद्र आपल्या भोवती फिरत असतो

तोच समुद्र धरून ठेवतो

तुझं ऐकतो अस पण म्हणतात

तू देतोस फुलं

मग स्वतःच्या पायावर ओढून घेतोस

मग कोमेजले की बाजूला करतोस

अस पण म्हणतात

की तूझे नाम घ्यायचे

तू माझ्यात पण आहे

तू त्याच्यात पण चराचरात आहेस

असा सर्वव्यापी आहेस परमात्मा

अस पण म्हणतात

तू कर्म पाहतोस

मागचं पुढचं सगळं

आणि न्याय पण करतोस

खरं खोटं सगळं करतोस म्हणे

साधं सोपं जे घडतं ते पण तूच करतोस

माझं अस काय आहे

माझं अस म्हणतात गंडलय सारं

फुकाचा सोंगट्या साऱ्या

पारावर चर्चा माझ्या

अस पण म्हणतात मी 

मी उंटाच्या ह्याचा मुका घेतो

मी भाडं खोलीत राहून ब्लॅकहोल पाहतो

असाच उडत देजावू मध्ये जातो

अस पण म्हणतात 

प्रेमात गुंततो दिसेल त्याला जवळ करतो

जवळ घेऊन कोलते

सगळं सगळं हाती लागेल ते फोल करतो

अस म्हणतात तुझं कौतुक करावं 

तू अंतर्यामी आहेस माहीत आहे

असं म्हणतात

अजिंक्य रोकडे

३१ जुलै २०२२

Comments

Popular posts from this blog

महत्वाच काहीतरी

तुझ्या दोन्ही त्या उरोजांनच्या मधोमध 🌼

आपण गिनतीतच न्हवतो 🌼