वाटाड्या

वाटाड्या


वडिलांना रोजच्या प्रमाणे नाक्यात सोडलं आणि पेट्रोल टाकायला पंपावर निघालो तर highway वर एक मुलगा tourist बॅग घेऊन  चालत  होता मी पुढे  निघून  गेलो पुन्हा मागे फिरुन त्याला थंबवलं त्याला त्याचा प्रवासाची माहिती विचारली तर तो म्हणे बेंगलूरू वरून आलो आहे hitch hiking करत संध्याकाळ पर्यंत मुंबईला पोहोचायचं आहे, रत्नागिरी मध्ये एका गॅरेजवाल्याकडे काल वस्तीला होता, मी तुझ्या बद्दल काहीतरी लिहीन असं बोललो आणि एक सेल्फी घेतली  गाडीवर बसूनच  नंतर मला वाटलं घरी नेऊया आणि ह्या असा प्रवास करण्याबाबत माहिती घेऊ किती दिवस झाले आपल्याला पण असंच काहीतरी करायच आहे, घरी  आल्यावर त्याला आमचं कोकणी पद्दतीचा घर बाहेरच आवडलं आणि नकळत त्याने व्हिडिओ चालू केली आणि कानडी  भाषेत घराची  आणि माझी माहिती देऊ लागला आता आपला आणि कॅमेराचा काही संबंध  नसताना डोळे वर खाली करत मी माझी माहिती वगरे सांगितली , घराबद्दल, इथल्या गावांबद्दल, लोकांबद्दल सांगू लागलो माझी सांगितलेली माहिती तो त्याचा भाषेत  रेकॉर्ड करत होता, माझी पुस्तकं दाखवली  आणि मग  चहा पाहुणचार  झाल्यावर मी त्याला सोनगाव कांदळवनात नेतो बाईकने वेळ असेल तर नक्की जाऊया असं बोलल्यावर तो तयार झाला, त्याला आमची  खाडी  आणि mangroove forest बद्दल माहिती दिली त्याने ती त्याचा भाषेत  सगळी माहिती नोंदवली मग मी तिथला  माझा लोकल  मित्र मंदार  दिवेकर ह्याला बोलावलं कारण त्याच ते मूळ गाव आणि तो आणि त्याचा भाऊ ह्या कांदळवना बद्दल कामं करत आहेत त्याच बरोबर mangroove forest cell देखील ह्या जागेबद्दल जनजागृती करीत आहे, त्याने ह्या सगळ्या नोंदी आपल्या व्हिडिओ मध्ये कैद केल्या, मंदार  आल्यावर मंदारने त्याला तिथला भौगोलिक विस्तार समजावून सांगितला,mangrooveच  biological importance सांगितलं आणि नंतर आम्ही माझ्या घरी आलो,त्याला मी राहण्याचा आग्रह केला पण त्याला मुंबईला पोहोचायचं होतं, मी मग माझ्या कामानिम्मित दुसरीकडे जाणार होतो म्हणून मंदार त्याला घेऊन त्याचा घरी गेला पण त्या आधी त्यांनी मला आणि मंदारला एक घट्ट  मिठी  मारली, मग मंदारच्या घरी जेवण वगरे झाल्यावर त्याला नाक्यात पुन्हा सोडलं तिथून तो तसाच पुढे  चालू  लागला, जस त्याला हा वेगळा अनुभव  तसा आम्हाला पण, भावा तू जे करतोयस एकवीसव्या वयात ते करायला मला तरी फार हिम्मत गोळा करावी लागेल, असं बोलल्यावर तो एकच वाक्य बोलला कि पहिली गाडी पकडलीस कि पुन्हा सोपं वाटतं.... तुझा प्रवास असंच तुझ्या म्हणण्यानुसार unexpected व्हावा...

@click_nadigs
@MANDARDIVEKAR_1
@DEVA_ROKADE

Comments

Popular posts from this blog

महत्वाच काहीतरी

तुझ्या दोन्ही त्या उरोजांनच्या मधोमध 🌼

आपण गिनतीतच न्हवतो 🌼