संघर्ष कुणाला नाही चुकला म्हणा, हे असं उदास आणि निराश वाटणं साहजिकच असतंय, मी बरेच जणांना पाहिलं आहे आव आणताना कि पहा किती पॉसिटीव्ह वगरे आहे पण सुखी तो असतो किंवा दिसतो, जो व्यक्त होत नाही.... मी नेहमी पाहत असतो पेजेस फेसबुक वर ज्यावर वेगळी वेगळी पेंटिंग्स वगरे असतात vincent van gogh सोबत ओळख झाली रमायला होतं त्याचा चित्रात, व्हिन्सेंट व्हॅन गॉग हा खरंच सध्या माझ्या आवडत्या कलाकारांपैकी एक झाला आहे, मी आता आता त्याचासोबत कनेक्ट होऊ लागलो, त्याची दुनिया रंजक आहे, जादुई आहे जे जे आपल्याला प्रश्न भेडसावत असतात त्यांना तो उत्तर आहे.... नैराश्य, चिंता आणि हजारो लफडी आणि स्वतःबद्दलची कीव आपण ज्या ज्या सोबत झुंजत आलो, भांडत आलो, निस्तरत आलो पण हे काही रडल्यागत नाही सांगत कॉमन आहे आणि सगळ्यांना मान्यच असतं थोड्याअधिक प्रमाणात ते आपलं 🫴 so called दुःख, पण काहीतरी सकारात्मक नसेल निष्कर्ष तर त्या कलेला आणि कलेच्या माऱ्याला काय अर्थ...... व्हॅन गॉगप्रमाणेच, मलाही नेहमीच रात्रीच आकर्षण राहिलं आहे. त्याच्यासाठी रात्र प्यारी होती आणि दिवसभराच्या कामानंतर त्याचा त्याचा एक स्पेस होता...