स्थित्यंतरे नको वाटतात , जैसे थे ची भूमिका किती सुखावह वाटते , प्रवास वेगात घडतो , वाचन , गाणी , कव्हर सोंग्स नाहीतर अभ्यास , अगदीच काही नाही तर गर्दीचं वाचन , केसांचे रंग , पेहराव , अंगकाठी , स्वभाव , शिव्या , आवाजातील हेल , राग , लोभ , प्रेम किंवा जास्तीत जास्त स्वार्थ…. घरी असणं , स्वतःबद्दल लिहिणं , स्वतःची लाल करणं , स्वतः खच्ची होणं , सर्व ठीक असत पण प्रवास आला की वेग आला , वेगाला नसतात थेहराव , गाडी पुढे जात असते , आपण पाहत बसायची मागे जाणारी झाड , डोंगर , माकडं , धड काही पाहता ही येत नाही … दगडं सारखीच वाटतात, त्यांना आपण रिलेट होतो , प्रकार बदल आपल्याला करता येत नाहीत , आपल्या हातात नाही , मोसमी कारणं एकतर मुलामे तरी चढवतात नाहीतर आकार तरी देतात , प्रवासात न कमावलेले पैसे पण खर्च होतात , मंदिरांना पाहून कौल पण लावता येत नाहीत मध्ये येत असतो तो वेग , घाटात मंदावतो , पण तेव्हा एकतर दरी पाहता येते नाहीतर डोंगर , हेच तर आवडत नाही ,अशीच परिस्थिती का नेहमी ? निवड !! का करायची निवड आणि एकच का ?? प्रवासात पाणी पण विकलं जात , बारमाही परा आठवतो , रगील असलेले मिनरल आठवतात … आपलं अस काय आहे ह्या जगात , सगळा व्यवहार आहे , प्रवासाची कारणं पण व्यवहारी असतात , कोण डील साठी , कोण नोकरी साठी , कोण लिखाणाची ओढ म्हणून , अनुभवाचा व्यवहार सर्व …. तथागता सारखा प्रवास जमला पाहिजे राव , ना त्याला वेग , ना कुठे व्यवहार , ना मुलामा ना मौसम … त्याचा प्रवास शारीरिक टेलीपोर्टेशन होतं जणू , होता आलं पाहिजे अणू पेक्षा सूक्ष्म , प्रकाशाच्या वेगापेक्षा वेगवान , कालातीत प्रवास करता येतील , मग जमेलही म्हणतात प्रवास पिढ्यानमध्ये , कारण आहे त्या शरीराने तर तूला संत होता येणार नाहीय , घालमेल तुझी जाता जाणार नाहीय , खिडकीचा मोह काय तुला सुटणार नाहीय , तुझे केस प्रवास थांबल्याशिवाय स्थिर होणार नाहींयत…
एक मोकळं माळरान आहे आणि मध्ये एकटंच झाड उभं आहे, पाठीमागे सूर्य मावळतोय, मस्त छटा दिसत आहेत, काही ढग काळे आहेत, काहींना सोनेरी कडा आहे. खाली जमीन तांबडी, तडे गेलेली. वाळलेल्या काड्या, जमवली तर फाटी जमतील गोयलाभर . सगळं शांत. पण त्या शांततेत एक कोलाहल पण जाणवतो आजकाल.... हुबेहूब वाटावं असं वातावरण.... आपण जन्माला येतो तेव्हाच पहिली परीक्षा सुरू होत असते, रडलास का नाही? श्वास घेतलास का नाही? वजन किती? पहिल्या दिवसापासून आपल्याला मोजलं जातं, तोललं जातं. मग शाळा सुरू होते. पाटी-पेन्सिल, दप्तराचं ओझं, आणि मार्कांचं टेन्शन. दहावी म्हणजे आयुष्याचा टर्निंग पॉइंट. बारावी म्हणजे करिअरचा पाया. CET, नोकरीसाठी इंटरव्ह्यू, पैसे, व्यापार....पेपर संपतच नाहीत, आयुष्याचा पेपर कधी पुढे पुढे सरकत जातो समजतच नाही... पण खरं सांगू? हे सगळे पेपर सोपे होते. कारण त्यात प्रश्न छापलेले असायचे. चार पर्याय असायचे. वेळ ठरलेली असायची. पास-नापासचा निकाल ठरलेला असायचा. पण इतर बितर चे प्रश्न आपण दूर लोटत जातो आणि खरी परीक्षा तेव्हा सुरू होते जेव्हा उत्तरप...
Comments
Post a Comment