झरा

तुझ्या माझ्या आठवणी ,
झऱ्यात पाहतोय….
वाहत्या पाण्यात ,
एक महाकवी राहतोय…
वाहताना तू , जाताना तू ,
दिला दगडाला आकार….
स्तब्धतेचा पुतळा मी ,
तुझा इथे थांबण्यास नकार….
मी निमुळता झालो क्षणोक्षणी ,
जादू तुझ्या स्पर्शाची…
मी भिजत झीजत राहिलो क्षणोक्षणी ,
गाथा ही आयुष्याची…
रात्री येईन म्हणतो ह्या झऱ्यावर ,
झरा चांदणे कोंदुन घेईल..
पहाट होता होता ,
कथा पैलतीरास नेईल..

अजिंक्य रोकडे

Comments

Popular posts from this blog

प्ल्यूटो🌼

आता सोड ना कविता 🌼

माझ्याकडे थोडेफार पैसे हवे होते 💰