गुडूप व्हावं लागतं...😌
वारसा व्हायला
आधी गुडूप व्हायला लागतं
उदरात
आज गेलेलं
खोदतील तेव्हा
रक्त मिळेल
का कार्बनच जास्त मिळेल
उकरून उकरून
अस काय उकरतो आपण
भूतकाळ इतिहास
मढी
काय निकष असतील तरी
किती सापळ्यांचा ढीग लागतो
स्टेनलेस स्टीलची भांडी लागतात
का मदरबोर्ड पण चालतील
संस्कृती आणि खाद्य
पेटित ठेवलेल
रेशनकार्ड पाहून समजतील
डब्यात तांदूळ
करंड्यात कुंकू
देवळात देव
सगळं इथेच असेल
निकष असे काय आहेत
जागतिक व्हायचे
व्यापारावर चलनावर
देवावर मूर्तीवर चित्रावर
की फक्त गुडूप होण्यावर
की वारसा व्हायला
आधी गुडूपच व्हायला लागतं
😀😀👌👌
ReplyDeleteधन्यवाद🍀
DeleteMast re ajinkya
ReplyDeleteधन्यवाद
Delete💕
ReplyDelete....आणि तुझ्या कावितेचा अर्थ समजायला पण त्या विश्वात गुडूपच व्हाव लागतं...!😅
ReplyDeleteमस्त लिहिलयस....दर्जा🤍
खूप खूप धन्यवाद
Delete