मी ओरबडणार नाही...

मी ओरबाडणार नाही
तू पाहत रहा
काही नको 
बोलत रहा
जगाचं काय 
नात्याला नाव
उर्फ़ट्या भावनांना 
अफवांचं नाव
माझी अशी ओळख
तुझी इज्जत
असा पुरुषार्थ 
आणि तशी बाई
स्पर्श नको पण 
ओकून बोल
मी बोलेन लाईफ
तू घाबरून दुःख तोल
जज होशील तू
कधी मी
व्याख्या तुझ्या 
व्याख्या माझ्या
समाजाचा 
अजून ठरल्या नाहीत
जेव्हा ठरतील तेव्हा 
ठरवू तू कोण
मी कोण
तुझं नातं 
माझं नातं
नावं देऊ….

Comments

Popular posts from this blog

प्ल्यूटो🌼

आता सोड ना कविता 🌼

माझ्याकडे थोडेफार पैसे हवे होते 💰