उणिवांचा बाजार

उणीवांच्या बाजारात अभिनय करत व्यव्हार्य अस काहीतरी साठंलोठं करून स्वतःवर अभिमान कर , चांगलं वागून झालेल्या नुकसानाची भरपाई मागू नकोस , व्यहारावरून , देण्याघेण्यावरून युद्ध झाली आहेत जगात , ती मढी आता उकरत बसू नकोस , तू पुनण्याची गणना कोण करी म्हणून चालत रहा , तुला अशी काही भीती वाटून देऊ नकोस की कुठे ह्या साऱ्याचा हिशोब होत असेल , हिशोबाची चिंता केलीस तर , आकडे मागे लागतील , ते आकडे मग तुला स्वभाव दाखवू लागतील , मग ते स्वभाव तुला त्रास देऊ लागतील आणि मग तू त्रासाला कंटाळून उदास होशील म्हणून , कच्चा रहा गणितात , हिशोब मांडू नकोस , येत असला तरी ….
      कुणी आपला अपमान केला तर त्याच्या मरणाची चिंता तू वाहू नकोस , तुझा जगण्याने काही फरक नसला पडत जगाला तरी जग , भविष्यात लुप्त झालेली संस्कृती शोधत असतील तेव्हा तुझा सांगाडा ,  आंनदी आणि दीर्घायु मानवाचे अवशेष म्हणून मागे राहिला पाहिजे , देऊळ मध्ये जसा ठिपका बनायला सांगतात अण्णा तसा रहा , तुझा केश्या होऊदेत , पिंजरा मधील मास्तर होऊदेत , मशाल मधील विनोद कुमार होऊदेत , सामना मधला मारुती कांबळे होऊदेत , तू असाच रहा केओस मध्ये मज्जा घे …..
       मी म्हणतो लाईक्स साठी लिही , प्रसिद्धी साठी लिही , हुकूमशाही सरकारविरोधात लिही , अन्यायाविरोधात लिही ,प्रस्थापितांबद्दल लिही , हावारा बन लोकांच्या नजरा आपल्याकडे ओढवून घ्यायला आणि नंतर ते सर्व मिळाल की त्याच लोकांसाठी काम कर , तुला अस काही वाटण म्हणजे तू नॉर्मल आहेस , तू कोणी संत नाहीस , महापुरुष नाहीस हे लवकरात लवकर समजून घे …….
       भाषेवर गर्व करू नकोस , धर्मावर , जातीवर , रक्तावर , जागेवर घरावर , जे जे मोठेपणाची लक्षणं आहेत त्यांना कोळून टाक , कमीतकमी सूर्यावर थुंक आणि परत येउदेत थुंकी तुझ्यावर , खरकट्या तोंडाने सांग जगाला मी सुर्यमालेच्या पोशिंद्याला आवाहन देत आहे , ताऱ्यांच्या गर्दीत हरवू नकोस , त्यांना मोजायला घे , त्यांना पण एक छोटसं अस आवाहन दे आणि घाणेरडी शिवी घाल …. त्यांना सांग माणसाची कदर करतोय मी , वेळ आलीच तर माणसांना पण दाखव जागा आणि सांग तुझे वैर कसे आणि कोणत्या ताऱ्यांसोबत होते कोणत्या सुर्यांसोबत होते ….

 अजिंक्य रोकडे

Comments

Popular posts from this blog

महत्वाच काहीतरी

तुझ्या दोन्ही त्या उरोजांनच्या मधोमध 🌼

आपण गिनतीतच न्हवतो 🌼