ताफा
आभासी प्रतिमेला
माणसाच्या छिनाल नजरेचे मैथुन मिळाले
सत्य नग्न झाल्यावर
सर्व धायमोकलून पळाले
ताफा पुढे मात्र थांबला
नेत्राच्या सुखाचे डोहाळे पुरविण्यास
नजारा मात्र खिन्न होता
त्यांना निर्मळ प्रेमाने रिजवण्यास
गाव लागले सभ्यतेचे
म्हणून सावरून घेतले सदरे
गलिच्छ अश्या रस्त्याचे
अंत होते साजिरे
गावात फिरताना बाता रंगल्या
परंपरेच्या
मनात मात्र मुर्त्या भंगल्या नग्नतेचा
मग कळून चुकले ताफ्याला
सदरे गावाचे पण चुरघळलेले
लाजेने केला प्रतिरोध नाहीतर
आत्मे सर्व सडलेले
अजिंक्य रोकडे ( देवा )
९/७/२०२०
Comments
Post a Comment