कॉन्शनट्रेशन कॅम्प
मी कॉन्शनट्रेशन कॅम्प मध्ये असतो तर
श्वास मोजले असते
खिडकी म्हणजे स्वातंत्र्य
बोललो तर श्वास निष्पर्ण
मी बोलणार नाही
हुकूमशाही
लोकशाही
मी श्वास वाचवणार
मी असा अलेबल राहणार
मित्र बनवणार
विरोधक पटवणार
लव्ह देणार रीऍक्ट होणार
पटलं ते घेणार
न पटलेलं कोलणार
तुझ्या व्याख्या खोडून काढणार
मी उंट तू त्याचा द्वार
मी पाईक तू उंटावर स्वार
असो फरक नसो काही
फरक दिसला की
माझा पेन उठतो
उठला पेन माझा
मग रेष मारूनच सोडतो
जी द्याल शाही
त्या शाहीचा पाईक बनिन
पण तू चुकलास
तर शब्दांनी जोरात हानीन…
Comments
Post a Comment