Skip to main content

Posts

Showing posts from March, 2023

प्रवासाला सलाम 🌼

एक माझ्या वयाचा मित्र असला बेफान होऊन मारामारी करायचा, रियल लाईफ मारामाऱ्या कश्या नुसती पकडून धरतात आणि एकामेकाला आवळत बसतात पण हा साला बेडम मारायचा पिक्चर मध्ये बुक्के वगरे मारतात तसा, तसं त्याला भांडण करायच सारासार कारण कधी गावल न्हवत तो त्याचा सगळा राग,द्वेष,गरिबी,नाकर्तेपणा सगळं कोणावर चान्स भेटला कि बाहेर काढायचा त्यात पाचवीला पूजलेलं त्याच दारूचं व्यसन, एक दिवस हे असेच सगळे रस्त्यात बाजूला गपचूप पीत बसलेले मी रस्त्याने गाडी चालवत जात होतो आणि अचानक समोरून एक बाईक आली आणि माझ्या गाडीचा जवळ जवळ येऊ लागली मी खाली उतरलो तरी अजून जवळ आली, पिलेली माणसं म्हणतात गाडी चालवताना लाईट पाहून त्याच दिशेने अजून जोरात जातात आणि अपघात करतात आणि अशी येत येत मला ठोकलं त्याने मी पडलो उठलो बघतो तर त्यालाच लागलेलं मी उचलायला गेलो तर हा आला कि नाही त्याला दे दना दन लाथा बुक्क्या घातल्या ह्यांनी का तर माझ्या मित्राला का ठोकलं,दारू पिऊन! का गाडी चालवतो आणि त्याचा सोबत बसलेले पण मग त्या गाडीवाल्याला मारायला लागले, मी ह्यांना थांबवलं कारण खूप वाईट वाटत होतं आणि ह्यांना शांत केल, ह्या...

बडबड

"काय बोलतोयस उनाचा पारा चढलाय काय तरी बडबड तरी मागे एकदा पिल्यावर काय भारी  बडबड केलेलीस हाय तेवढी पण उतरून गेलेली" गण्या "बघ ना अखंड देह रम्या म्हण नाहीतर रमेश इथला नसलाच तर? ज्यांच्यावर मी प्रेम केलं ते केलंच नसेल पण त्या एका तत्वा फित्वावर केलं असेल त्या माणसाच्या कुठेतरी असण्यावर केलं असल, खूप सारे प्रश्न आहेत बघ गण्या, बघ ना मी आहे पण मी नाहीय रे इथे, मला वाटतंय कि मी कशात तरी गुंतलो आहे कोणत्यातरी गोष्टीवर मी प्रेम करत आहे करत राहीन एक न दिसणारा देह असेल आत्मा असेल काहीतरी असेल इथून कुठे तरी दुरवर.... कधी कधी मी उगच रडतो बघ, उगच  फॉर्मात पण येतो पार चेक्काळून जातो,कधी कधी वाटतं खूपच  प्रेम मिळतंय मला आणि असं वाटतं ते जे काही आहे तर आपल्या आतमध्ये देहात ह्या रम्या मध्ये आहे, शोधू कसा गण्या, कुठे  आहे ते?ह्या जगातल तरी आहे का ते? बघ  ना इतकी माणसा आहेत इकडं पण तसं कोणीच  नाही रे आलं आजतगायत...असं वाटतंय ते जे काही आहे ना ते असं जन्मोजन्मीच कोणतरी आहे माझ्या मनातलं खुशपट असल्यागत, असं मन कधी कधी  कावरं होतं तेव्हा बघ वाटतं ते पण मला शोधत असल कुठंतरी...