प्रवासाला सलाम 🌼

एक माझ्या वयाचा मित्र असला बेफान होऊन मारामारी करायचा, रियल लाईफ मारामाऱ्या कश्या नुसती पकडून धरतात आणि एकामेकाला आवळत बसतात पण हा साला बेडम मारायचा पिक्चर मध्ये बुक्के वगरे मारतात तसा, तसं त्याला भांडण करायच सारासार कारण कधी गावल न्हवत तो त्याचा सगळा राग,द्वेष,गरिबी,नाकर्तेपणा सगळं कोणावर चान्स भेटला कि बाहेर काढायचा त्यात पाचवीला पूजलेलं त्याच दारूचं व्यसन, एक दिवस हे असेच सगळे रस्त्यात बाजूला गपचूप पीत बसलेले मी रस्त्याने गाडी चालवत जात होतो आणि अचानक समोरून एक बाईक आली आणि माझ्या गाडीचा जवळ जवळ येऊ लागली मी खाली उतरलो तरी अजून जवळ आली, पिलेली माणसं म्हणतात गाडी चालवताना लाईट पाहून त्याच दिशेने अजून जोरात जातात आणि अपघात करतात आणि अशी येत येत मला ठोकलं त्याने मी पडलो उठलो बघतो तर त्यालाच लागलेलं मी उचलायला गेलो तर हा आला कि नाही त्याला दे दना दन लाथा बुक्क्या घातल्या ह्यांनी का तर माझ्या मित्राला का ठोकलं,दारू पिऊन! का गाडी चालवतो आणि त्याचा सोबत बसलेले पण मग त्या गाडीवाल्याला मारायला लागले, मी ह्यांना थांबवलं कारण खूप वाईट वाटत होतं आणि ह्यांना शांत केल, ह्यांची मजल अशी कि त्याच्या गाडीचे इंडिकेटर वगरे फोडले हे जाऊन पुन्हा पीत बसले,मी त्याला उचलल गाडीला किक मारून दिली तो गेला त्याचा इंडिकेटर पडलेला मी उचलून घेतला आणि सकाळी त्याची माहिती काढली तर तो आलेला नवीन भाडेकरू होता.पोरं सकाळी म्हणतात आधी बोलला नाही आपल्या इथेच राहतो इतकं कशाला मारलं असतं, मग मी ह्यांना घेऊन त्याला इंडिकेटर दिला आणि ह्यांनी चक्क माफी मागितली त्याचा हँगओव्हर कुठचा कुठे गेलेला ह्यांना पाहून, नंतर कधी मी ह्यांना कुणाचा छाताडावर बसून मारताना वगरे पाहिलं आहे आणि त्या छाताडावर बसलेल्या माणसाला तिसरंच कुणीतरी येऊन लाथेने उडवताना पाहिलं आहे दगडफेक करताना पाहिलं आहे, वासे घेऊन पळताना पाहिलं आहे पण त्यानन्तर पिढी शिकली म्हणा, समंजस झाली म्हणा, किंवा काही म्हणा, हिंसा कमी होऊ लागली पोरं घर बांधू लागली लग्नासाठी म्हणा किंवा आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे म्हणून, ही लोकं सारवन सोडून टाईल्स वर आली, त्याचबरोबर स्टेट्स आला, गाड्या आल्या त्यांचबरोबर मेहनत आणि जबाबदारी आली असेल, ह्याच सगळ्यांना मी सॉरी बोलताना पाहिलं आहे भांडण मिटवताना पाहिलं आहे लोकांनी त्यांचं कौतुक करताना पाहिलं आहे, मी त्याच भूमिकेत राहिलो असेन बहुतेक किंवा मी पण बदललो असेन पण अश्या ह्या लोकांना अश्या तीनशे साठ अंशात उभारी घेताना किंवा सुधारणा म्हणणार नाही पण स्वतःला सावरण्याच्या प्रवासाला माझा नेहमी सलाम असतो कारण सरतेशेवटी काहीहि असो इकडं सगळं बाकी आलबेल असतंय....


अजिंक्य रोकडे
#बाकीआलबेल

Comments

Popular posts from this blog

महत्वाच काहीतरी

तुझ्या दोन्ही त्या उरोजांनच्या मधोमध 🌼

आपण गिनतीतच न्हवतो 🌼