बडबड

"काय बोलतोयस उनाचा पारा चढलाय काय तरी बडबड तरी मागे एकदा पिल्यावर काय भारी  बडबड केलेलीस हाय तेवढी पण उतरून गेलेली" गण्या

"बघ ना अखंड देह रम्या म्हण नाहीतर रमेश इथला नसलाच तर? ज्यांच्यावर मी प्रेम केलं ते केलंच नसेल पण त्या एका तत्वा फित्वावर केलं असेल त्या माणसाच्या कुठेतरी असण्यावर केलं असल, खूप सारे प्रश्न आहेत बघ गण्या, बघ ना मी आहे पण मी नाहीय रे इथे, मला वाटतंय कि मी कशात तरी गुंतलो आहे कोणत्यातरी गोष्टीवर मी प्रेम करत आहे करत राहीन एक न दिसणारा देह असेल आत्मा असेल काहीतरी असेल इथून कुठे तरी दुरवर.... कधी कधी मी उगच रडतो बघ, उगच  फॉर्मात पण येतो पार चेक्काळून जातो,कधी कधी वाटतं खूपच  प्रेम मिळतंय मला आणि असं वाटतं ते जे काही आहे तर आपल्या आतमध्ये देहात ह्या रम्या मध्ये आहे, शोधू कसा गण्या, कुठे  आहे ते?ह्या जगातल तरी आहे का ते? बघ  ना इतकी माणसा आहेत इकडं पण तसं कोणीच  नाही रे आलं आजतगायत...असं वाटतंय ते जे काही आहे ना ते असं जन्मोजन्मीच कोणतरी आहे माझ्या मनातलं खुशपट असल्यागत, असं मन कधी कधी  कावरं होतं तेव्हा बघ वाटतं ते पण मला शोधत असल कुठंतरी! कधी  गाठभेट होईल गड्या काय माहित... काय होतंय काय माहित सगळं कस अर्थहीन होत गेलंय,सगळं कस रिकामं,खाली, शून्य  वाटतंय, त्यात हि उन्हाची रखरख,लगा काय गारवा वाटल समोरासमोर आम्ही येऊ तेव्हा आठवूनच कसस होतंय गण्या, कधी कधी  वाटतं नाहीच होणार बघ  असलं काही ह्या जल्मात तरी ह्या लोकांत तरी, वाईट वाटतं रे...दुसऱ्या जगात काय होत असल रे तुला तरी कसलं दगड माहित दुसऱ्या तिसऱ्या जगाचं, तिकडे  असेल बघ आमच्या भेटीचा  सोहळा, देव जाने...हें असलं मनात आजकाल  बघ यायला लागलंय बहुतेक  अशी  नाय का काहीतरी ज्ञानप्राप्ती झाल्यावणी मी माझ्याच चिंतेत आहे, विरहात आहे उगाचच, असं वाटत राहतं कोणतरी वाट बघतंय, आपल्यावर प्रेम करतय..!!!झोपला व्हय उठ कि लगा.. " रम्या


#बाकिआलबेल
#अजिंक्य रोकडे (देवा)

Comments

Popular posts from this blog

महत्वाच काहीतरी

तुझ्या दोन्ही त्या उरोजांनच्या मधोमध 🌼

आपण गिनतीतच न्हवतो 🌼