आपण गिनतीतच न्हवतो 🌼



हिशेब मांडायचास
पोरांना दाखवायसास
पावत्या
गंडत #डीत गेले हिशोब
आता गिनतीत नाहीस
गिनती विसरलास
आपण न्हवतो
प्रेमात न्हवतो
नात्यात न्हवतो
जातीत न्हवतो
जातीत असलो तर वयात न्हवतो
आपण न्हवतोच
आपण कधीच गिनतीत न्हवतो
तसे होतो समसमान पर्याय होतो
पण कधी योग्य न्हवतो
योग्य असलो तरी भ्रष्ट न्हवतो
भ्रष्ट असलो तरी प्रामाणिक पण न्हवतो
आपण न्हवतो
आपण कधीच गिनतीत न्हवतो
आपण पन्नास ते साठ होतो
कधी नव्वद तर चुकून न्हवतो
चुकून नव्वद असलो तर भ्रष्ट होतो
आपण मतमतांतरात मत न्हवतो
आपण कधी स्पष्ट न्हवतो
स्पष्ट असलो तरी मजबूर न्हवतो
मजबूर असून गाफिल न्हवतो
आपण कधीच गिनतीत न्हवतो
आपण खून दरोडे न्हवतो
आपण सुजाण वगरे पण न्हवतो
पण न्याय सांगतील तो पण न्हवतो
आग क्रांती वगरे पण न्हवतो
आपण  न्यायनिवाडा न्हवतो
आपण न्हवतो
आपण गिनतीत पण न्हवतो
आपण सुखी कधीकधी न्हवतो
आपण दुःखी नेहेमी न्हवतो
आपण गंगा आकाश क्वचित न्हवतो
सारासार विवेक चुकून न्हवतो
गंडत गेलो पण बरोबर न्हवतो
आपण न्हवतो
आपण कधीच गिनतीत न्हवतो

अजिंक्य रोकडे
#बाकीआलबेल 

Comments

  1. खूपचं सुंदर.... अप्रतीम रोकडे साहेब💯❤️❤️🙌

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद🌼🌼, नाव कळवा 😊🌼

      Delete
    2. अतिसुंदर भाऊ

      Delete
  2. Awesome ajinkya❤

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

महत्वाच काहीतरी

तुझ्या दोन्ही त्या उरोजांनच्या मधोमध 🌼