बाकी आलबेलने आसमंत केला 🌼


ह्या एकांतीत गजबजलेल्या रस्त्यावर
हजारो स्वप्न आपणच आपली तुडवली
माझ्या कवितेच्या कवीला शब्द गावल्यावर
आनंदी आणि प्रेमाची लाखोली तुडवल्यावर

मग त्याने एक चित्र काढलयं
राग आणि द्वेषाने भरलेल्या जगात
जड मनाने हताश अंतःकरणाने लिहलंय
भग्न अवशेष स्वतःचे शोधले आहेत वगात

 त्यानी वेश्या लिहल्या येडी लिहली
 जुगारी, चोर आणि पळून जाणारी पाहिली
 एक दोन दिन मजबूर कहाणी रातोरात पिली
आशेचा किरण सतेज पाहून कांती कशी त्याची उजळून निघाली

शब्द गोंगाट करत आणि धुरातून कापत निघाले
प्रस्थापित असलेल्याना प्रश्न अन्नूलेखाने उत्तरं मारत निघाले
पात्रांमधून त्याच्या सगळे कसे न्हावून निघाले
त्या पात्रात शोधत त्याचे वाचणारे

त्यांने मजूर लिहले आणि असे निरागस लिहले विसरलेल्या सावल्या लिहल्या
कवितेत आवाज लिहला
रूढी वगरे साऱ्या तडीपार नेल्या

कधी नव्हे त्या क्रांत्या तडीपार केल्या
कोपऱ्यातल्या अंधारात वाती नेल्या
बाकी आलबेलने रस्त्यावरचा कविता
आसमंत केल्या..


अजिंक्य रोकडे
बाकी आलबेल

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

महत्वाच काहीतरी

तुझ्या दोन्ही त्या उरोजांनच्या मधोमध 🌼

आपण गिनतीतच न्हवतो 🌼