चाफा कधीच कोमेजू नये 🌼


चाफा कधीच कोमेजू नये
हा माझा हट्ट खरा
त्याचा वास घेत राहायला हात वरती करू नये 
छातीपाशी खिशात ठेऊन घेता यावा निरंतर
खरं तर केसं पण पिकू नये कुणाची
नां कुणाला ययातिची फिलिंग यावी
नां कुणी यतीची वाट पाहावी
सगळं कसं चालू राहावं कष्टाविना
चालू रहावं दुःखाविना 
असावं सगळं कसं आलबेल
चाफा सुकू नये कधी
सुवास कोमेजू नये
कधी कधी वाटतं त्यांना तोडू पण नये
त्यांना पण जगू द्यावं असंच सुवासिक
नाकं न्ह्यावी फुलाजवळ
होऊ नं द्यावा मृत्यू
देव,माणूस कुणाच्या चरणी नको कुणाचा आवडता नको होऊ द्यावं त्याला
चाफ्याची जिंदगी त्यालाच माहित
सुंदरतेचे भोग सगळे
आवडतीचे रोग सगळे
मग म्हणाल चाफा बोलेना
चाफा चालेना
कसा चालेल कसा बोलेल
चुकून विचार येऊ नये
चाफा कधीच कोमेजू नये

अजिंक्य रोकडे

#बाकीआलबेल 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

महत्वाच काहीतरी

तुझ्या दोन्ही त्या उरोजांनच्या मधोमध 🌼

आपण गिनतीतच न्हवतो 🌼