प्रवास आपला कधी नं जावा संपून...✨🏔️


विरान पडलेल्या वाळवंटी प्रदेशात
बर्फ अचानक पडावा
इगलू मात्र आपला सुका सुका असावा
त्यात बॅगेतून आणलेला कांदा मिरची टोमॅटो सारं काढून
दोन चार पाईनची फाटी आणून आग लावावी
दगडाने दगडावर रगडून
तुझ्या माझ्या थरथरत्या हाताला मग आगीची उब
त्या आगीवर भगूणं छोटंसं ठेवून
करावे पदार्थ आपण हवे नको आपल्याला
दोघांनी मिळून भूक मिटवावी
घासावर घास छोटे ठेऊन
पसरावी पश्मिना चादर तलम
झोपावं दोघांनी कुशीत कुशी घालून
स्पर्शावर स्पर्श करावा हट्टी बनून
झोपेत जागेपणीची स्वप्न पुरी करावी मग
पाहिलेली स्वप्न पूर्णत्वास न्यावी मग
स्वप्नात स्वप्न बनून राहावं
डोळ्यांवर डोळे ठेवावे काजळाने मिटून
सकाळ व्हावी चेहऱ्यासमोर एकमेकांच्या
चेहरे नवीन वाटावे एकमेकांचे
इगलू मधून बाहेर येऊन पुन्हा वाट शोधावी
पायावर पाय ठेऊन चालावी दोघांनी 
प्रवास आपला कधी नं जावा संपून...

अजिंक्य रोकडे

Comments

  1. छान आहे 🌼

    ReplyDelete
    Replies
    1. तुझी कंमेंट पाहून छान वाटलं 🌼

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

महत्वाच काहीतरी

तुझ्या दोन्ही त्या उरोजांनच्या मधोमध 🌼

आपण गिनतीतच न्हवतो 🌼