कधी जॉन कधी मी…


आजकाल न ठरवून दिसतेस 
खूपच बेकार दिसतेस
घरी येतो जॉन ऐकतो 
कोणीतरी साला त्याला पण डीसलाईक करून जातो
कुणी त्याचा राग करतो ह्यावर पण मला राग येतो 
मग तो म्हणतो 
बोलते क्यों नही मेरे अपने 
आबले पड़ गए जबान में क्या 
तसा त्याला लिहितो मग पोस्ट नाही करत
सल्ला उपदेश टीका 
पुस्तकं मग खोलीत
त्याची गणना कोण तोलित 
मग जॉन येतो बोलतो 
कभी आराम नही पा सकता 
एकच दुःख आहे 
त्याला पण तुझा चेहरा 
कधी असा बोलतो नन्तर मनमौजी होतो 
कधी हिंदुस्थान होतो कधी तो पाक होतो
कधी अमरोहात जन्म घेतो , कधी अर्धा पाक मध्ये मयत होतो
शिलगवतो शब्द आणि सिगारेटचा धूर
कधी मांडीवर थाप कधी केसांना झटका डोळ्यात महापूर
जॉन भारी पण मान नाही
शेवटी मरतो दोघे 
कधी जॉन कधी मी…


अजिंक्य रोकडे

Comments

Popular posts from this blog

महत्वाच काहीतरी

तुझ्या दोन्ही त्या उरोजांनच्या मधोमध 🌼

आपण गिनतीतच न्हवतो 🌼