भाषेचं काय...
भाषेच काय शुद्ध वाणी
दुष्काळी भागात बोरिंगचं पाणी
भुकेला कसली भाषा हाय
ब्रिंजल काय आणि वायंगा काय
एकच भाजी आयेने विळ्यावर घेतली
भाषेची जागा भुकेने घेतली
बस्स का भैय्या
पठारावर बोलला
कोकणात बोलला
हट्ट साला भैया साईडला घेऊन कोलला
कोकणातली माणसं शहळ्यांनी भरली
पठारावरची लाव्यावर तरली
भाषेच काय शुद्ध वाणी
दुष्काळी भागात बोरिंगचं पाणी
भूमीपुत्रांची माती
एस यु वी च्या चाकाला
पेट्रोलचे दर
शेम्बुड आपल्या नाकाला
भाषेच काय शुद्ध वाणी
दुष्काळी भागात बोरिंगचं पाणी
पाण्याला विहीर
विहिरीला मोटर
आमचा तो नाला तुमच ते गटर
हेल तुझा चुकला
आता झाला राडा
भाषा बघ त्याची
भाषेच काय शुद्ध वाणी
दुष्काळी भागात बोरिंगचं पाणी
अजिंक्य रोकडे
😀😀👌👌
ReplyDeleteछान👍
ReplyDeleteBhai bhari
ReplyDelete