Posts

बदलणाऱ्या प्रायोरिटीज

 गणपती जवळ आले की भाताची पाती अजून गडद हिरवी होतात , बारीक बारीक कण यायला सुरुवात होते , त्यात दूध असतं , दाताखाली दाबून धरलं की फार मस्त लागतं , कुठल्यातरी केमिकल मुळे त्यात स्त्रवला असतो म्हणे म्हणून त्याचा सुवास येतो , काल परवाच वाचलं आहे , पण आता दाताखाली भात फक्त शिजवलेला येतो , लक्षातच राहत नाही अश्या रात्रीच का आठवण येते असली काही उगाचच करायची , ह्या वर्षी भात लावला आहे थोड्या जागेत , दिवसेंदिवस त्याला वाढताना पाहताना जाम आनंद होतो , तो वाढत जातोय तसा त्याचा रंग बदलतो , एक काडीचा भात आहे आमचा त्यामुळे घनदाट नाही , त्याचा मधून माणूस फिरू शकतो , गणपतीनन्तर चतुर येतात मोठ्या संख्येत , काही चतुर सिंगल असतात तर काही एकामेकावर स्वार , हिराच्या झाडूला हातात घेऊन हात अलबेल हवेत फिरवले की दोन चतुर मिळायचे त्यांना दोरीने बांधून मग दाराच्या शिगेला बांधून ठेवायचो पण सकाळी मेल्यावर जाम वाटायचं पण पुन्हा तोच दिनक्रम , भाताच्या चोंड्यात मधोमध जाऊन त्यांना पकडाव अस वाटायचं पण तेव्हा ओरडा नको म्हणून पायवाटेने शिकार चालायची , आता थोड्या दिवसांनी आमच्या भाताची वाढ होईल तेव्हा खूप चतुर यावे अशी...

स्टँड वर एक दिवस

     स्टँड वर दिवसभर बसून रहा , एका पॉईंट नन्तर आजूबाजूचे आवाज , कुणाची भांडणं , चिवडा , वडापाव , लोणचं , सगळं एकदम काही वेळानन्तर न्यूटरल वाटू लागतं , भिकारी तास तास भर झोपतात त्यांची झोप भयानक वाटते , निर्धास्त मेंदू आणि उपाशी पोटाची भूक घाबरवून सोडते , झोपेतून उठल्यावर त्यांचे चेहरे भयानक सिरीयस असतात , एकटक पाहत रहातात , हरवण्यास काही नसलं , स्वप्न नसली , आशावाद नसला की चेहरे असे होत असतील अस वाटतं , म्हातारी माणसं चेहऱ्यावर पुस्तकाची पानं ठेवल्यासारखी वाटतात ज्यात तक्रार असते आयुष्याची न मिळालेल्या सुखाची न भेटलेलेल्या प्रेमाची , उबेची …. काही बेवडे असतात पावलं इकडे तिकडे टाकत जवळ येऊन बसतील , वेळ विचारतील पैसे मागतील , भिकारी येतील थाळी पुढे करतील हे फार लाजवतात , आपलंच आपल्या मनासोबत भांडण लावून देतात दिले तरी नाही दिले तरी.     कधी कोणी अचानक येऊन बाजूला बसलं आणि त्याचा घाण वास मारत असला तर मी लगेच रिऍक्ट होत नाही , त्यांना काय वाटेल अस विचार येतो मग काहीतरी कारण काढून बाजूला जातो …        खूप श्रीमंत लोकं त्या उंच बसेसने जातात ,...