बदलणाऱ्या प्रायोरिटीज
गणपती जवळ आले की भाताची पाती अजून गडद हिरवी होतात , बारीक बारीक कण यायला सुरुवात होते , त्यात दूध असतं , दाताखाली दाबून धरलं की फार मस्त लागतं , कुठल्यातरी केमिकल मुळे त्यात स्त्रवला असतो म्हणे म्हणून त्याचा सुवास येतो , काल परवाच वाचलं आहे , पण आता दाताखाली भात फक्त शिजवलेला येतो , लक्षातच राहत नाही अश्या रात्रीच का आठवण येते असली काही उगाचच करायची , ह्या वर्षी भात लावला आहे थोड्या जागेत , दिवसेंदिवस त्याला वाढताना पाहताना जाम आनंद होतो , तो वाढत जातोय तसा त्याचा रंग बदलतो , एक काडीचा भात आहे आमचा त्यामुळे घनदाट नाही , त्याचा मधून माणूस फिरू शकतो , गणपतीनन्तर चतुर येतात मोठ्या संख्येत , काही चतुर सिंगल असतात तर काही एकामेकावर स्वार , हिराच्या झाडूला हातात घेऊन हात अलबेल हवेत फिरवले की दोन चतुर मिळायचे त्यांना दोरीने बांधून मग दाराच्या शिगेला बांधून ठेवायचो पण सकाळी मेल्यावर जाम वाटायचं पण पुन्हा तोच दिनक्रम , भाताच्या चोंड्यात मधोमध जाऊन त्यांना पकडाव अस वाटायचं पण तेव्हा ओरडा नको म्हणून पायवाटेने शिकार चालायची , आता थोड्या दिवसांनी आमच्या भाताची वाढ होईल तेव्हा खूप चतुर यावे अशी अपेक्षा आहे , शिकार करायला न्हवे तर भाताच्या मधोमध जाऊन मनाची शांती करायला , कोण काय बोलतो पाहू मग ! फक्त पाहत बसायचं आहे कसे चेन ने फिरतात अस्थावयस्थ .
काल वर्गात कवडे , कबुतर पकडायला फासकी कशी लावू हा प्रश्न विचारला , मी सांगितलं नाही पण त्यांनी ते शोधून काढल , त्यावरून मी लावलेली पहिली फासकी आठवली , त्यात कोण जाणे कसा मला एक पोपट मिळाला , मी त्याला फडफडताना पाहून जाम टरकलो , एका तरबेज मित्राला घेऊन आलो , त्याने त्याला काढलं हातात घेतल , माझं आता नाव होणार होतं , पण त्याला हात लावायला भीती वाटत होती मग थोड्यावेळाने भीती कमी झाली मी हातात घेतल त्याला , फार मुलायम जणूकाही त्याच्यामध्ये रक्त नाही फक्त हवा आहे , पण आता त्याला ठेवायचं कस , पैसे जमवून पिंजरा आणायच ठरलं पण आजची रात्र कशी काढायची मग आमचा उंदराचा पिंजरा कामी आला , सकाळी उठून पहिला पिंजरा बघितला पाहतो तर त्याने त्याचे गज वाकवून पळ काढली होती फार वाईट वाटलं मला , नन्तर मी पोपट विकत घ्यायचा प्रयत्न केला पण सगळे कबुतर विकणारे होते , मग कबुतर भेटला माझ्या फासकी मध्ये त्याला मी पायाला दोरी बांधून ठेवला होता पण तो पण दोन तीन दिवसाने सुटला , तस पण त्याच्यात तेज उरलं न्हवतं , तो उडताना दिसायचा दोरीसकट……
परवा कुणीतरी नखभुंग्याचा फोटो टाकला होता , काटेरी झाडावर असायचे खूप फिरलो आहे त्याचा मागे , त्यांना एका बरणीत ठेवायचो , त्या बरणीला हवा जाण्यासाठी होल होते , पूर्वी गणपती मुर्त्या साध्या रंगाच्या असायच्या नंतर भडक चमकणारा रंग यायला लागला , तशी पाठ असायची त्यांची , मला वाटायचं कुणीतरी ह्या भुंग्याना खरंच तर रंग नसेल ना देत झिरोच्या ब्रशने , नर मादी बरणीत ठेवून अजून एक अपोआप होईल असं वाटायचं पण अस कधी झालं नाही , जमलं नसेल त्यांच . एक दिवस ते पण मरायचे , मग त्यांच नख काढून फेविकोलने आपल्या नखांवर चिकटवून शाळेत जायचो , खेळताना वगरे ते पण तुटून जायचं , आता नखभुंगे दिसत नाहीत , त्या साठी लागणारी पायपीट आणि उत्सुकता किंवा असुरी आनंदात असणारी निरागसता आता उरली नाही का ? सगळं आहे तसच आहे पण मग आपण बदललो कसे , माणसाच्या प्रयोरिटीज वयापरत्वे का बदलतात , हे सगळे अजून यायचे तेव्हा येतात , जायचं तेव्हाच जातात , स्वतःच स्वतःचा घात पण करीत नाही , कोणीतरी मुलगा आपल्याला मारत आहे म्हणून त्याचा पासून लांब पण जात नाहीत… सगळं ठरलेलं असतं आपणच चुकतो जपता येत नाही फार जवळ जातो , गेलो तर परत येतो , नाहीतर गुदमरवतो , बांधतो , उपकतो , सगळं करून पाहतो आणि मग आपणच त्रास करून घेतो … अस बरच काही आहे … बाकी अलबेल…!!
अजिंक्य रोकडे
💞👍👍👍
ReplyDelete👍👍💯
ReplyDelete👌👌 खूप छान
ReplyDeleteधन्यवाद सर
Delete💕
ReplyDelete👌👌
ReplyDelete