गाडीखाली मार्क्स आला
गाडीखाली कार्ल मार्क्स आला…
उजव्या बाजूने जायला हव्या होत्या त्या गाड्या ,
मला घासून रॉंग साईडने येऊ लागल्यात ,
पाहतो तर उजव्या बाजूला , कामगार भैय्ये , रस्त्यावर ,
भुकेची , वासनेची , जोरूची चर्चा करत होते ,
डोक्यात सनक गेली ,
अरे एक साईड पकड के खडे रहने का ???
त्यातल्या एका कार्लने कडक नजर फिरवली ,
माझीच फाटली , झाट्याचा भूमिपुत्र तू ,
तो खंडला आणि स्वप्न जगला ,
त्याने ते तरी केलं ,
तू बापाच्या गाडीवर फिरून ,
एक साईडच तत्वज्ञान सांगतो ,
त्यांच्या साईड सेफ आहेत ,
बायकोला मनी ट्रान्सफर होतो ,
आईच्या गुढघ्याला तेल जात ,
तू फुकट खातो , स्पोर्ट बाईक वरून साईड ठरवतो ,
नजरेत त्यांनी माझी मारली ,
त्याचा नजरेत मला डांगे भेटला ,
पुढे कचकन ब्रेक मारला ,
गाडीखाली मार्क्स आला….
Comments
Post a Comment