न्यूट्रल मी....😐

स्थळ - सरकारी इस्पितळ 

      तर केसपेपरचे पैसे एकाने आमच्याकडे सुट्टे न्हवते म्हणून भरले , त्याला सर्दी ताप होता पण उपचाराआधी त्याला टेस्ट करायला सांगितली , आमचं काही वेगळं काम होतं , त्यात आम्हाला जाम मदत झाली , आमचं काम झालं आम्ही बाहेर निघायला आलो , पण तो व्यक्ती गाडीवर गडबडीत रागात स्पीड मध्ये जाऊ लागला , तिथला स्टाफ त्याला हाक मारत होता , आमचे पैसे भरले म्हणून आम्ही त्याला हाक मारत होतो थांबला , म्हणाला मला गरज नाही , दोन तास झाले आहे इथे साधी सर्दी आहे मला , म्हणून लोकं येत नाहीत तुमच्या अश्या वागण्याने ….!!! आणि तो निघून गेला , आम्ही सांगितलं जाऊदे त्याला …. मी म्हणालो , लोकांकडे संयम नाही … घरी आलो झोपलो..

◆◆◆◆◆◆◆

     मानव संसाधन विकास मध्ये आरोग्य हा विषय जाम hectic आहे , ह्या महामारीचा काळात सरकारी आरोग्य यंत्रणेच तस कौतुक केलं पाहिजे कारण हे काम कस चालतं ते मी सामाजिक कार्यकर्ते व pandemic नावाची सीरिज आहे त्यात भारतातील सरकारी यंत्रणेने एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात ह्या आधी आलेल्या महामारी व रोग कसे हातातळे तसलं काहीसं दाखवलं होतं , सगळ्या योजना भरभरून आहेत , त्याचा लोकं वापर करत आहेत , योग्य ते उपचार उपलब्ध आहेत , इतकी काळजी घ्यावी सरकारने आपली , तस पण संस्थात्मक प्रसूती साठी आपण प्रयत्न केले पाहिजे आहेत असं पण मी दोघं तिघे जणांना बोललो आहे , कारण योजना इतक्या परिपूर्ण वाटतात की खरंच आपण पण त्या गोष्टीना प्राधान्य दिलं पाहिजे ना की खाजगी रुग्णालयांना ..…. पण काही ठिकाणी तश्या सुविधा नाहीयत कारण वापर नाही म्हणून उपकरणं नाहीत  , बर ठीक आहे आपलं सामान्य मनाचं समाधान करणं महत्वाचं आहे , लोकांमध्ये जागृती हवी आहे , ती आपण करूच , आपल्यापासून सुरू करू म्हणून मी एक निर्णय फार पूर्वीच घेतला आहे की संस्थात्मक उपचार घ्यायचे , इतर ठिकाणी १००० १५०० घालवणं देखील वाचतं आणि आपल्या पासून काहीतरी नवीन सुरुवात आपल्या सोबत आपले इतर मित्र देखील माझ्या सोबत येत जातील , उपचार घेतील …. 
       मला बरं वाटत न्हवत घसा खवखवणे , थोडी सर्दी आणि सुक्या खोकल्यामुळे पोटात डाव्या साईड मध्ये तणाव , तर मी निघालो पहिल्या दिवशी डॉक्टर न्हवते स्टाफ नुसार डॉक्टर होते येऊन गेले , मी म्हणालो इतका काही मी आजारी नाहीय एक दिवस सहन करू शकतो सकाळची वेळ विचारून मी हजर राहिलो , केसपेपर काढला आईने काढला . केसपेपर काढताना माझ्या मागे एक कुटुंब होतं , तसं इकडे तिकडे पाहणं , आत्मविश्वास कमी , भीती जास्त अश्या अवस्थतेत तर मग हे गरीब असणार असे काहीसे माझ्या निकषांवर मी सांगत आहे ना की पेहरावावर , त्यांचा हातात एक काही महिन्यांचं लेकरू , जाम दुर्दैवी खोकत होतं , अंगावर काटा येईल असं , मी माझा खोकला विसरलो …. मी आतमध्ये गेलो डॉक्टरांची नजर मोबाईल मध्ये , मी माझा त्रास सगळा सांगितला , त्यांनी न बघताच सांगितलं केसपेपर काढ , मी म्हणलं आहे , त्यांनी माझ्याकडे न बघताच केसपेपर साठी हात पुढे केला , औषधं लिहिली आणि त्यांचा कृपाकटाक्ष न घेताच केवळ ३ ४ मिनिटात मी बाहेर …. नन्तर मम्मी आतमध्ये गेली ती पण तशीच बाहेर आली , मी बाहेर येऊन स्टाफला ऐकू जाईल अश्या आवाजात बोललो अग ते बघत पण नाहीत पेशंटकडे … तेवढ्यात ती बाई बाळाला घेऊन बाहेर आली आणि औषधं घ्यायला लाईन मध्ये आली , मी स्टाफला बोललो की एक काम करा इथेच लक्षणं ऐका आणि इथेच औषधं देत जा आतमध्ये तर पाहत देखील नाहीत पेशंटकडे , त्या मुलाचा खोकला माझ्या मागे सुरू होता , त्या बाईला विचारलं अहो बाळाला हात तरी लावला का ??? ती मान हलवतच नाही म्हणाली …. काय करू समजेना म्हणलं असच असेल आता असर पडणार असेल निष्णात डॉक्टर असतील जेणेकरुन पाहताच त्यांना सगळं समजत असेल पाहू फरक पडतो का गोळ्यांनी … आता फरक पडेल न पडेल मला माहित नाही मी असा न तसा बरा होऊ शकतो , माझी परिस्थिती आहे खाजगी उपचार घ्यायची पण त्या बाळाचं काय असा विचार गाडी चालवताना होता , चुकीचे इंडिकेटर देत गाडी चालवत होतो डोकं सुन्न झालं , बाळाचं काय ..?? 
     पुढे गाडी चालवताना पण मी न्यूट्रल राहून विचार करायचा प्रयत्न केला पण न्हवतं जमत , एका पुलाखालून जाताना वरतून ट्रेन गेली , मी तिथून गाडी फास्ट मारली , ह्या घटनेमुळे मला भीती वाटली असेल का ?? मी मम्मीला बोललो अग हा पूल पडणार तर नाय ना ?? ते वागले तसं जरासं जरी हा पूल बांधणारे वागले तर काय होईल…?? मम्मी म्हणाली , पिक्चर मध्ये तरी काय वेगळं दाखवतात …
      एकंदरीत ही भीती मला वाटू शकते , तर खरच जे सामाजिकदृष्ट्या , आर्थिकदृष्टीने फार वंचीत आहेत त्यांना भीती देखील वाटत नसेल , ते आपल्या आपल्या आयुष्यात सहन करत आलबेल असतील…. तर मी सरकारी उपचार घेईनच ह्यापुढे देखील पण प्रत्येक जण असा नसेल , लोकं पर्याय शोधत असतात , इथे तर जीवाचा प्रश्न आहे , लोकं कर्ज काढून जीव वाचवतील … पण मग आपण लोकांचा दृष्टीकोन संस्थात्मक उपचार घेण्यासाठी तयार का करायचा हा प्रश्न मला सतावत आहे …. नाहीतर बस्स सर्पदंश आणि विंचूदंश आणि लसीकरण अश्या कारणांसाठी मर्यादित राहतील ह्या इमारती …. 

#बाकीआलबेल

अजिंक्य रोकडे

Comments

Popular posts from this blog

महत्वाच काहीतरी

तुझ्या दोन्ही त्या उरोजांनच्या मधोमध 🌼

आपण गिनतीतच न्हवतो 🌼