मी त्याचा सारखा लिहितोय 💛

मी त्याच्या सारख लिहितोय 
आलबेल बिंदास होतोय 
नाक्यावरचा कवी झालोय 
कधी किरकिर कधी काव्यात वाहतोय 
मी आयुष्यात गंडलोय
जसं मद्यधुंद कवीच नृत्य बनतोय 
हजारो संधीचा लाभ एक झालोय 
अंधार स्वीकारत हास्य फेक होतोय 
माझे शब्द कच्चे म्हणे
ग्रामर गंडलय
यमक हरलंय
आमचं आयुष्य सरलंय
भ्रमनिरास झालेल्या जगाचे वाभाडे मोजतोय
मी पितोय सोबत शब्दांचा जुगार खेळतोय
क्षणभंगुर आनंद शोधतोय
अर्थाच्या चेतनेचा पाठलाग करतोय
माझी कविता समजावी म्हणून
त्या सत्याची चावी  शोधतोय
माझे शब्द निषेध केलेत ते नॉर्मल करतोय
अनुरूप असं काही नाही
त्या अनुरूपतेच्या विरूद्ध बंड करतोय
समाजाच्या रूढी आणि समज
त्या मधील अंतर मोजतोय
मी बहिष्कृत, चुकीचे आणि हरवलेल्यांना आलिंगण देतोय
ज्यांनी आयुष्याला आवाहन दिलंय त्यांना आवाज देतोय
मी प्रेमाबद्दल लिहितोय
सुंदर जे आहे ते हवंय आणि दुःखद जे आहे ते पण शोधतोय
हिरमुसली हृदये आणि राख झालेली स्वप्ने सावडतोय आणि प्रेमाकडे वळतोय
मी सांसारिक देखाव्याकडे सुंदरतेच्या नजरेने क्वचित पाहतोय 
गलिच्छ बारमध्ये स्वतःला शोधतोय
एकांतीत खोलीत हजार पुस्तकं होतोय
मी बिंदास होतोय
किमान आलबेल होतोय
किंवा होण्याचा प्रयत्न करतोय
जीवनातील विरोधाभास होतोय
त्याची कडवी कथा वळणावर नेतोय
माझ्या शब्दात तुम्हाला मानवी स्थितीचे प्रतिबिंब देतोय 
यश अपयश सौंदर्य आणि उपहास म्हणून हवा करतोय काव्यमय प्रवासाचा सागर भरतोय...

बाकिआलेबल
अजिंक्य रोकडे 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

महत्वाच काहीतरी

तुझ्या दोन्ही त्या उरोजांनच्या मधोमध 🌼

आपण गिनतीतच न्हवतो 🌼