Skip to main content

मी मेसेज करत जातो 🤍✨




काल स्वप्नात तिला काल्पनिक hii केला मी, बोललो काहीसं, सांगितलं भूक लागतेय फार आणि खूप सारं खाऊन पुन्हा भूक लागतेय नाही खाल्लं कि विकनेस येतो विचाराने, तू नाय नाय करत तरी माझा विचार करत असशील का तुला भूक लागत असेल का कि जेवण झाला का हा काल्पनिक मेसेज माझा जातोय तुला मग मी गारव्या मध्ये गरम शोधत बुरमूस टोचणारी घेऊन हवं नको असलेलं ऍडजस्ट करत खाज उताणा झोपून तुझ्या भावना चेपत जातोय निरामय आत्म्याच्या भाराखाली हलक्या शरीराने तेव्हा तुला मेसेज जातोय झोपलीस का, तू झोपत अशील का विचाराने झोपेत साप वगरे येतात मी लय घाण घाण स्वप्न बघतोय लोकांना मारतोय, apocalypse पाहतोय पेट्रोल वगरेचा जागतिक पाऊस पडत आहे मी हतबल सगळं पाहून पळत आहे लोकं पळत आहेत मी घाबरून जातोय खुश होतोय लोकांना पळताना आणि अचानक माझा तोल जाऊन पडतोय आणि उठतोय झोपेतून तेव्हा माझी  ऍड्रेणिल रश जो सत्यात नाही तो स्वप्नांत पूर्ण झाला म्हणून उठून घाबरलेला खुश मी, मी घाण स्वप्न असंच पाहत गेलो, गिल्टी झालो, चिवळत बसलो गु घाण, तुला असं झालंय का कधी, असं निरपेक्ष वेडेपणाची स्वप्न तुला अधून मधून पडत असतील का तेव्हा मी मेसेज करतो, कशी आहेस?
मी फॉर्म भरतो दाखले काढतो जागेत येतो जागा शोधतो आणि मग युद्ध करतो, युद्धात कधी तयारीने कधी तलवार विसरतो किंवा युद्धात उतरलो तयारीने कि पाऊस पडून ताप येतो मी नां आता पुरता हतबल होतो, तेव्हा मी अजून एक मेसेज करतो, कसं चाललंय? मी नां कामात आता प्रामाणिक आहे पगार जास्त स्त्रीचा, तुझ्यावर काही मी प्रेमाचे शब्द उधळले म्हणून, तू स्त्री किंवा आवडती व्यक्ती तरी,  तुझा पगार जास्त आहे आता आणि मी तुला स्वप्न वगरे दाखवत होतो, तेव्हा वरून काहीशे कोटी वरून माझ्याबाबत कोटी करत होते, आता तुला नवल वाटेल का माझ्या काहीश्या परवडणार्या गिफ्ट मध्ये, तेव्हा मी मेसेज करतो, काय कसा चाललाय जॉब? तूझ्या निर्णयाने तुझ्या आयुष्यात असलं नसलेल्या प्रेमात तू खुश असताना, माझ्या माझ्या आयुष्यात असले नसलेल्या होऊ घातलेल्या किंवा होऊन आपल्या डेस्टिनीमुळे मलाच विश्वास नसलेल्या conclusion च्या अंदाजाने मी तुझं असं खुश असणं वगरे एन्जॉय करतो आनंदी राहतो आणि हसण्याच्या गालावरील पेशी खुलून येतात खऱ्या आनंदाने तेव्हा मी मेसेज करतो, जमतंय नां??काही प्रॉब्लेम असला तर कळव? मी असा असला नसलेला आहे, भेटलेला, दिसलेला आहे, लोकांनी ओळखीत ठेवलेला आहे, मी नव्वद सत्तर नाही त्यामुळे मी मध्यम पन्नास साठ आहे, आता स्थिरस्तावर नाही पण मूलभूत गरज आहे,मी आता प्रेम वगरे नाही पण आनंदी आहे, मी आता कसा वेगळा वगरे जसा तुला आवडलेला नाही आलबेल आहे...तेव्हा मी मेसेज केला, चल बोलत राहू अधून मधून...... आणि मग अचानक खड्यात पडतो आणि जाग येते तेव्हा मी असाच स्वतःच स्वतःला भेटतो,  लागलं आहे का पाहतो, कुठे आहे, होतो पुन्हा ठीक आणि नाव घेतो देवाचं बाकी आलबेल.. 🤍

अजिंक्य रोकडे 

Comments

Popular posts from this blog

अनामिक🌼

     त्यादिवशी नाक्यात गेलेलो , फॉर्म भरला , ५००० जागा आणि एक माझी पोस्ट ह्या आशेवर , ओबीसीला ह्यावेळी जोराच माप मिळालं म्हणावं , सकाळपासून आहे इथेच भूक अनावर होत होती , वडापाव खात होतो पण कोणीतरी ओळखीचं आजू बाजूने जातच असत पण काही वेळा वेगळे भास होतात , तस पण सगळे हवं हवं असणार दृश्य शोधत असतात , मी कॉलेज वरून , कामावरून येणाऱ्या , मुली ,  स्त्रिया दिसतात का पाहायला नजर इकडे तिकडे केली , हो म्हणूनच , एक मुलगी जणू एवढ्या पावसात पण पाय घाण न होता चालत होती  , माझी नजर तिच्या पायांवर गेली , पैंजण होतं , पदवी शिक्षण झालं असेल , माझ्या वयाची आहे , पाय गोरे आहेत , सुंदर असणार , इतक्या अलगद कश्या चालू शकतात ह्या मुली , मला तर पाय साफ ठेऊन गाडी पण चालवता येत नाही , जन्मतः मुली अश्याच असतात का , किती काळजी घेतात स्वतःची , मी वर पाहिलं तर आखीव रेखीव शरीर , चेहरा गोलच , हो गोलच होता , एकंदरीत केस पण छान होती , मला छोटी केस आवडत नाहीत आणि आवडली तर पूर्ण बोबकट असावा , डोळे तिच्यावर स्थिर केले आणि तिने पण माझ्याकडे पाहिलं , मी चावा घेतला वड्यावर आणि नेमकं तेव्हाच हिने मला पह...

उभे असू जिथे, तिथे नवीन परीक्षा द्यायला🖤💫

           एक मोकळं माळरान आहे आणि मध्ये एकटंच झाड उभं आहे, पाठीमागे सूर्य मावळतोय, मस्त छटा दिसत आहेत, काही ढग काळे आहेत, काहींना सोनेरी कडा आहे. खाली जमीन तांबडी, तडे गेलेली. वाळलेल्या काड्या, जमवली तर फाटी जमतील गोयलाभर . सगळं शांत. पण त्या शांततेत एक कोलाहल पण जाणवतो आजकाल.... हुबेहूब वाटावं असं वातावरण.... आपण जन्माला येतो तेव्हाच पहिली परीक्षा सुरू होत असते, रडलास का नाही? श्वास घेतलास का नाही? वजन किती? पहिल्या दिवसापासून आपल्याला मोजलं जातं, तोललं जातं. मग शाळा सुरू होते. पाटी-पेन्सिल, दप्तराचं ओझं, आणि मार्कांचं टेन्शन. दहावी म्हणजे आयुष्याचा टर्निंग पॉइंट. बारावी म्हणजे करिअरचा पाया. CET, नोकरीसाठी इंटरव्ह्यू, पैसे, व्यापार....पेपर संपतच नाहीत, आयुष्याचा पेपर कधी पुढे पुढे सरकत जातो समजतच नाही...    पण खरं सांगू? हे सगळे पेपर सोपे होते. कारण त्यात प्रश्न छापलेले असायचे. चार पर्याय असायचे. वेळ ठरलेली असायची. पास-नापासचा निकाल ठरलेला असायचा. पण इतर बितर चे प्रश्न आपण दूर लोटत जातो आणि खरी परीक्षा तेव्हा सुरू होते जेव्हा उत्तरप...

तुला कोड्स मध्ये शोधेन म्हणतो 🩶

उन्माद संपून जाईल तेव्हा  खरे उरतील सकल जण  पण त्याविन मग काय उरेल  जमिनीत काय उगवेल  आणि कोण काय पुरेल  घरी काही,  कुणाला न बोलता येऊन दाखव  कुणाचा ना रुसवा घेऊन ये  न कुणाला दिसता फिरून दाखव  एक दिवस कुणाची शपथ न घेता ये  ये असाच कधीतरी रिकामे रिकामे सागर भर  टेबलाचे वेगळे वेगळे परिप्रेक्ष दाखव  दाखव माणसाची उत्क्रांती कशी झाली  किती मिथकं आणि किती गोष्टी लयास गेल्या  उरले सुरले कसे सावरले  आवरले आणि आवरून कसे माजले सारे  एकजात कसे  वातावरणीय ढोबळ मनाने अंदाज बांध  महामारीवर रडलास तसं युद्धावर रडून दाखव  फोड खापर असंख्य गोष्टींवर जगावर  नाहीतर नाही तर, तारे आहेत लुकलूकतात  त्यांची उत्पत्ती बोल  ठिपका आहोत आपण असे मार एक एक  झोपी जाऊन पुन्हा ये ग्लिच बनून मित्रा  तुला कोड्स मध्ये शोधेन म्हणतो.....