बाकी आलबेल अर्थहीन आहे 😵‍💫


कविता करूया का विचाराने
कविता होतेय
अनामिक लागलेली आर्थिक भीक
कवितेच्या आड येतेय
विचार आणि प्रगल्भता उसने आलेले विचार
असामान्य असलेले विचार असामान्य असलेले आचार
आणि ह्यात काहीच साम्य नसलेलं आयुष्य
ह्या सगळ्या कोलाहालात झालेला कवी लाचार
कविता उरात आहे सत्यात नाही
सत्यातून खोट्यात पण नाही
येत नाहीय जोर लावून
वाटतंय करावी भावना आहे खवून
शब्द यमक होईल पण करतो उसवून
उगच शिवी नको बघुया फसवून
साला आता मनं सांभाळू वाटतात
पत्रे उडाले म्हणतात नां लागले
कि कविता सोज्वळ करतोय
असल्या हजारो विचारांचं मंथन करतोय
कोण म्हणतंय कवितेला अर्थ हवा
कोण म्हणतंय त्याला यमक हवं
आपल्याला पटलेलं रुचलेलं सुचलेलं
अर्थहीन काही का असेना अर्थहीनच गमक हवं
बाकी आलबेल कविता करत जातो
बाकी आलबेल गृहीत धरत जातो
बाकी आलबेल अर्थहीन आहे
मर्म शोधू नका
त्याच्या शब्दात अर्थ शोधू नका


#बाकी आलबेल
अजिंक्य रोकडे 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

महत्वाच काहीतरी

तुझ्या दोन्ही त्या उरोजांनच्या मधोमध 🌼

आपण गिनतीतच न्हवतो 🌼