धडा आयुष्यभराचा 🍂
मी कसा शिक्षक झालो हा मलाच पडणारा प्रश्न नेहमी असतो, लोकांना पण तोच प्रश्न पडतो, बरेच टोमणे पण ऐकतो मी लोकांचे माझा पास्ट फार struggle चा राहिला आहे पण त्याच रडगाणं राहिलं बाजूला मला सांगायचा पण नाही, मी जेव्हा शिक्षक म्हणून गेलो थेट दहावीच्या वर्गात पाठवलं मला काहीच पूर्वतयारी नाही मी कैलास सत्यार्थी ह्यांचा धडा lets march म्हणून शिकवायला घेतला, मला कल्पना होती हें काय आहे आणि काय होतं, कैलास सत्यार्थी कोण मलाला कोण मला माहित होते, त्यामुळे जबरदस्त lecture झालं आणि एक वेगळंच कॉन्फिडन्स आला माझ्यात नंतर वर्ष निघून गेलं एक batch चांगल्या मार्क्सने बाहेर पडली आणि आज पून्हा तोच धडा शिकवताना शाळेच्या बाहेरच्या आवारात काही मजूर पाईपलाईन जलजीवन का कश्या साठी खड्डे मारत होते मी शिकवत होतो नेमका हाच धडा ( कैलास ह्यांना नोबेल मिळालं तेव्हा नॉर्वे मधील भाषण ) आणि बाहेर एक त्या मजुरांची मुलगी एका स्टीलच्या डब्यात तांदूळ उकडून केलेली पेज पीत होती, शाळेसमोरून जाणारी लोकं नेहमी चालू असतात तर ती मुलगी माणसं अनोळखी दिसली कि झाडामागे लपून ती पेज प्यायची ( ह्याची कारण नेमकी ह्याच धड्यात होती ) शिकवून मी समोरच उदाहरण दिलं आणि विचारलं ही मुलं कुठे हवी होती तर मुलं म्हणाली शाळेत, मला जिंकल्यासारखं वाटलं, मुलांना समजतंय मी शिकवतोय ते ह्याचा फार आनंद झाला पण एका पॉईंटला पुस्तकात कोणत्या ओळीवर आहोत हें शोधावं लागत होतं, मन थाऱ्यावर न्हवतं आणि सांगायचं हें मी काहीच केलं नाही कारण मला मुलांना सांगायचं होतं कि व्यवस्था पण फसते आणि आपण ते मान्य केलं पाहिजे .... मी असं का बोलतोय कारण पूर्ण अभ्यासक्रमात मला आवडलेला तो धडा आहे एकदा वाचल्यावर समजेल मी असं का बोलतोय...धडा मोठा आहे पण शेवटच्या काही ओळी इथे देतो : I am sure you can - Now, listen to that child. Listen please.
Today, I see thousands of Mahatma Gandhis, Nelson Mandelas and Martin Luther Kings calling on us.
Let us democratise knowledge. Let us universalise justice. Together, let us globalise compassion!
I call upon you in this room, and all across the world. I call for a march from exploitation to education, I call for a march from poverty to shared prosperity, a march from slavery to liberty, and a march from violence to peace.
Let us march from ignorance to awakening. Let us march from darkness to light. Let us march from mortality to divinity.
Let us march!
- (Nobel Acceptance Speech by Kailash Satyarthi)
#बाकीआलबेल
#अजिंक्य (देवा) रोकडे
Comments
Post a Comment