Skip to main content

किर्रर्र 🍃

   लाकडी आरामाखुर्चीवर जेव्हा रघु बसला तेव्हा 'किर्रर्र' असा आवाज आला, विचारांची साखळी काही वेळा साठी स्तब्ध झाली आणि पुन्हा स्वतःला कमफॉर्टेबल करून घेतल्यास ती साखळी नव्या विचारांना वाट करून देऊ लागली... रघु नुकताच कामावरून आलेला, समाधानी वाटाव इतकं समाधान तर होतच त्याचाकडे पण मन सैरावैरा, कानात वारा गेलेल्या वासारा सारखं वेडंवाकडं पळत होतं, ह्याच कारण अचानक गार वारं सुटलेलं, हवेत गारवा आलेला आणि त्यासोबत पालापाचोळा उडत खिडक्यानमधून आतमध्ये येत होता, एरवी तो कचराच जणू पण आज ते काहीतरी भासवत होतं, रघुने जेव्हा पहिल्यांदा गाडी घेतलेली तेव्हा लीलासोबत रघु बाईकने फिरायला गेलेला, चहाच्या टपरीवर थांबले असताना असंच काहीसं वातावरण तयार झालेलं, तिचे केस तेव्हा हवेत एक फ्रेम बनवून आकाशासोबत एक सुंदर कलाकृती बनवू पाहत होते, चहाच्या वाफा तिच्या चसम्यावर येऊ पाहत होत्या आणि ती चष्मा व्यवस्थित करू पाहत होती, ओढणी सांभाळत होती अशी तिची अल्लड गडबड झालेली, रघुच्या मनात एक सुंदर आठवन, आयुष्यात घडलेल्या चांगल्या गोष्टींच्या यादीत त्यांनी ठेवलेली ती आठवण आज मनात ह्या वातावरणाने रेंगाळत होती, पूर्णपणे भावाविश्वात अडकेलेल्या रघु भानावर आला तो आईच्या हाकेने,
आई - रघु चहा घे...
थोडासा निराश होत रघु आतमध्ये जाऊन त्याने त्याच्या लॉक लावलेल्या कपाटाच्या कप्यात चहा पीत पीत पाहायला सुरुवात केली आणि थोडा धूसर झालेला एक फोटो त्याने काढला जो तिचे काही दाखले काढून देताना ह्याने आपल्याजवळ जपून ठेवलेला, थोडा जीर्णच झालेला कारण शर्ट सोबत धुवून निघालेला... तरीदेखील पुन्हा एकदा पाहून रघुने कपाट बंद केलं आणि पुन्हा खुर्चीवर येऊन वाऱ्याचा आवाज ऐकत आपली पाठ टेकवत एकटक समोर मोकळ्या आकाशात पाहू लागला आणि विचाराची साखळी पुन्हा सुरु झाली......
    रघु -असं वातावरण त्याआधी देखील झालेलं, वाटत होतं पाऊस पडेल पण सगळे अंगण्यात बसलेलो, आजी रहस्यमयी गोष्टी सांगायची आणि असं वाटायचं जणू त्यातील वाईट पात्र आताच येत आहे, विजा कडकडत आहेत पण पुन्हा एखादं शांत, लोभस पात्र आलं कि तेच वातावरण रोमँटिक वाटायचं, आजीची स्टोरीटेलिंग फार सुंदर होती का माझं इंटरप्रिटेशन...आजीच्या गोष्टी जगाच्या पलीकडे न्यायच्या, गावाला, घराला विसरून एक वेगळच आसमंत पहुडायला मिळायचं, आजी जेव्हा वारली तेव्हा तिच्यासोबत तिच्या गोष्टीपण वारल्या किंवा अर्धमेल्या असतील कारण त्या अंधुकच आठवतात....कामावरून येऊन पण मी पुन्हा पार्ट टाइम पैसे कमावतो रोजचंच झालंय, मी समाधानी आहे तरी मला का जावं वाटतं कामावर, तशी काही खास गरजच नाहीय, आज वातावरण किती सुंदर आहे कि भकास आहे... ठरवू शकत नाही... जातोच...
    रघु उठून थेट उठून निघून गेला, बाईकचा आवाज येताच आई बाहेर आली तिने रघुला जाताना पाहिलं आणि त्याची खुर्ची पाहून आईने खास काही काम नसल्याकारणाने निवांत बसण्याचा निर्णय घेतला...पुन्हा एकादा 'किर्रर्र' असा आवाज झाला आणि थोड्यावेळासाठी स्तब्ध होऊन विचारांची साखळी सुरु झाली...
आई - किती छान वातावरण आहे, लहानपण पूर्ण शेतात मेहनत करून गेलं, ऊन पाऊस वारा... एकच मौसम सारा.......... 




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अनामिक🌼

     त्यादिवशी नाक्यात गेलेलो , फॉर्म भरला , ५००० जागा आणि एक माझी पोस्ट ह्या आशेवर , ओबीसीला ह्यावेळी जोराच माप मिळालं म्हणावं , सकाळपासून आहे इथेच भूक अनावर होत होती , वडापाव खात होतो पण कोणीतरी ओळखीचं आजू बाजूने जातच असत पण काही वेळा वेगळे भास होतात , तस पण सगळे हवं हवं असणार दृश्य शोधत असतात , मी कॉलेज वरून , कामावरून येणाऱ्या , मुली ,  स्त्रिया दिसतात का पाहायला नजर इकडे तिकडे केली , हो म्हणूनच , एक मुलगी जणू एवढ्या पावसात पण पाय घाण न होता चालत होती  , माझी नजर तिच्या पायांवर गेली , पैंजण होतं , पदवी शिक्षण झालं असेल , माझ्या वयाची आहे , पाय गोरे आहेत , सुंदर असणार , इतक्या अलगद कश्या चालू शकतात ह्या मुली , मला तर पाय साफ ठेऊन गाडी पण चालवता येत नाही , जन्मतः मुली अश्याच असतात का , किती काळजी घेतात स्वतःची , मी वर पाहिलं तर आखीव रेखीव शरीर , चेहरा गोलच , हो गोलच होता , एकंदरीत केस पण छान होती , मला छोटी केस आवडत नाहीत आणि आवडली तर पूर्ण बोबकट असावा , डोळे तिच्यावर स्थिर केले आणि तिने पण माझ्याकडे पाहिलं , मी चावा घेतला वड्यावर आणि नेमकं तेव्हाच हिने मला पह...

उभे असू जिथे, तिथे नवीन परीक्षा द्यायला🖤💫

           एक मोकळं माळरान आहे आणि मध्ये एकटंच झाड उभं आहे, पाठीमागे सूर्य मावळतोय, मस्त छटा दिसत आहेत, काही ढग काळे आहेत, काहींना सोनेरी कडा आहे. खाली जमीन तांबडी, तडे गेलेली. वाळलेल्या काड्या, जमवली तर फाटी जमतील गोयलाभर . सगळं शांत. पण त्या शांततेत एक कोलाहल पण जाणवतो आजकाल.... हुबेहूब वाटावं असं वातावरण.... आपण जन्माला येतो तेव्हाच पहिली परीक्षा सुरू होत असते, रडलास का नाही? श्वास घेतलास का नाही? वजन किती? पहिल्या दिवसापासून आपल्याला मोजलं जातं, तोललं जातं. मग शाळा सुरू होते. पाटी-पेन्सिल, दप्तराचं ओझं, आणि मार्कांचं टेन्शन. दहावी म्हणजे आयुष्याचा टर्निंग पॉइंट. बारावी म्हणजे करिअरचा पाया. CET, नोकरीसाठी इंटरव्ह्यू, पैसे, व्यापार....पेपर संपतच नाहीत, आयुष्याचा पेपर कधी पुढे पुढे सरकत जातो समजतच नाही...    पण खरं सांगू? हे सगळे पेपर सोपे होते. कारण त्यात प्रश्न छापलेले असायचे. चार पर्याय असायचे. वेळ ठरलेली असायची. पास-नापासचा निकाल ठरलेला असायचा. पण इतर बितर चे प्रश्न आपण दूर लोटत जातो आणि खरी परीक्षा तेव्हा सुरू होते जेव्हा उत्तरप...

तुला कोड्स मध्ये शोधेन म्हणतो 🩶

उन्माद संपून जाईल तेव्हा  खरे उरतील सकल जण  पण त्याविन मग काय उरेल  जमिनीत काय उगवेल  आणि कोण काय पुरेल  घरी काही,  कुणाला न बोलता येऊन दाखव  कुणाचा ना रुसवा घेऊन ये  न कुणाला दिसता फिरून दाखव  एक दिवस कुणाची शपथ न घेता ये  ये असाच कधीतरी रिकामे रिकामे सागर भर  टेबलाचे वेगळे वेगळे परिप्रेक्ष दाखव  दाखव माणसाची उत्क्रांती कशी झाली  किती मिथकं आणि किती गोष्टी लयास गेल्या  उरले सुरले कसे सावरले  आवरले आणि आवरून कसे माजले सारे  एकजात कसे  वातावरणीय ढोबळ मनाने अंदाज बांध  महामारीवर रडलास तसं युद्धावर रडून दाखव  फोड खापर असंख्य गोष्टींवर जगावर  नाहीतर नाही तर, तारे आहेत लुकलूकतात  त्यांची उत्पत्ती बोल  ठिपका आहोत आपण असे मार एक एक  झोपी जाऊन पुन्हा ये ग्लिच बनून मित्रा  तुला कोड्स मध्ये शोधेन म्हणतो.....