प्रेम करण्यायोग्य जेव्हा कोण मिळेल.. 🌼

प्रेम करण्यायोग्य जेव्हा कोण मिळेल
तेव्हा तू जाशील दूर रानात तेव्हा
तिथे खूप सारी घनदाट झाडी मिळेल
पण ओलावा शोधत असताना तुला समजेल
माझे विचार किती तरल होते
हातात हात घेऊन जेव्हा वाळूवर पाय रोवून
तुम्ही जेव्हा प्रेम करत असाल तेव्हा समजेल
माझी नजर क्षितिज भेदत होती 
कॅफे मध्ये वाफालणारी थंड कॉफ़ी तुम्ही
एका स्ट्राव मधून पिऊ लागाल तेव्हा
माझी तहान तुझ्या लाळेपेक्षा मोठी होती हे समजेल
तुम्ही एकादी निर्जन जागा पहाल
आडवे इन्फ्रंट होत जाल तेव्हा समजेल
माझ्या मनात बस स्पर्शाच्या भावना होत्या
तुम्ही उभे राहाल बोहल्यावर तेव्हा
संगीत असं विरश्री मध्ये असेल
पण तूला माझी आठवन येईल आणि समजेल
मी कसा सुमधुर होतो..

#बाकीआलबेल
अजिंक्य रोकडे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

महत्वाच काहीतरी

तुझ्या दोन्ही त्या उरोजांनच्या मधोमध 🌼

आपण गिनतीतच न्हवतो 🌼