घरा सुधरू लागली हात, वाडीतली पोरा मोठी व्हाया लागलीत हात, पैसा आलाय, म्हातारा गेल्यापासून एकटीच मरतेय ह्या मापाच्या घरात, मला तरी कशाला हवाय मरायला चांगला घर, पोरा बाला असती तर एकांदी बारीस वाटला असता, काय रुबाब होता नय, सावकार आमचा म्हातारा मेला दारू नी वाट लावलंन नाहीतर काय जमीन म्हणून होती, नवीन आलली घरी तेव्हा म्हतारा अडल्या नडल्या माणसाला उभा राहायचा, आता कोण बोलील काय?मला पण नको झालाय हा जिना, म्हाताऱ्याची रया गेली ती जमीन लुबाडलिन तेवा, नाहीतर म्हातारा माझा चांगला होता,शेती वर सगला संसार उभा केलेलंन, पण जमीनच परकी झाली आणि म्हातारा येडाच झाला, दारू काय आणि मला शिव्या काय,आंब म्हणून काय यायचं, मला पिऊन आला कि बोलायचा आपली कलमा आणि तू एकसारखी मेली वांझोटी झालीयत, मी आपली गप गार देव्हाऱ्यात जाऊन टिपा गालित बसायची, कुणाला सांगणार, भयनी झाल्या तरी त्यांना त्यांचा याप काय कमी होता, मेली ही पुरुष जातच घोड्यान काढलली, किती पण जीव आटवा मेली बाई माणसाला ऐकून दाखवतील, मेली गुलाम झाली नाय ती कधी, तसा होता मेला चांगला पैसं कमी झाल्यावर डालगी बनवू लागलेला, हाताला कला होती, असा उपाशी मारणाऱ्यातला न्हवता, हा समोरच शेवटचा डालगा बनवलान तो ठिवलेला हाय मेल्याची आठवण म्हणून, मरतात कोंबड्या शीटतात त्यात, शेवट शेवटला तग धरून होता, सगला जागंवर, मेली मला घाण वाटायची पण माझाच म्हातारा दुसरा होता कोण त्याला, पोर बाल असता आम्हाला तर सुनेन लेकिन केलान असतान, काढलन असती घान मेल्याची, पण माझ्या भोगास होती त्याची सेवा मी केली इमान इतबारीन.. कधी बाहेर उंबीरटीच्या जाऊन दिलंन नाय मला, कधी कुणाच्या दारास गेलीला मेल्याला खपला नाही त्याला, मायेन कधी नीट बघितलंन पण नसन, मला तर बाय आठवत नाय, मेला तवा अखं गाव पासली पडलला अंगण्यात,मला काय झालं समजलाच नाय मी रडत होतो मधेच थांबत होतो, लोकं मेली बोलत होती म्हातारा चांगला होता, पोर बाल नाय पण चांगला होता, मेला जाताना पण लोकाच्या तोंडान मला ऐकवुनच गेला, नाय पण खरंच माझा म्हातारा चांगला होता..... 🌱

🥹👌👌
ReplyDelete🥹🥀
ReplyDelete