सुना है जंगलों का भी कोई दस्तूर होता है🌱
हैदराबाद मधील कांचा फॉरेस्ट (गाचीबोवली) रडत आहे. देशाचा राष्ट्रीय पक्षी रडत आहे.या दिवसात, या इतर भूतकाळातल्या अप्रासंगिक कोलाहलतून जर वायरल झालेली कांचा फॉरेस्ट मध्ये वृक्षतोड, जंगलतोड करतानाची विडियो पाहिली असेल, त्यात पक्षी रडत आहेत , जसा एखाद्या मनुष्याचा निवारा गेल्यावर माणूस रडतो तसाच कोणताही संवेदनशील माणूस की परिस्थिती पाहून निराश होईल. हैद्राबाद युनिवर्सिटीची ४०० एकर जागा तेलंगणा सरकार लिलावात काढण्यास उत्सुक आहे, कशासाठी तर आय.टी. पार्क बनविण्याचा त्यांचा मानस आहे. ४०० एकर जागा ही काही छोटी मोठी गोष्ट नाही. दक्षिण भारतातल्या लोकांकडे आपण सरसकट सुशिक्षित राज्यं ,लोकं म्हणून पाहतो, पण ही काही तशी लक्षणं दिसून येत नाहीत.युनिव्हर्सिटीचे शिक्षक, कर्मचारी, विदयार्थी पर्यावरणवादी बरेच दिवस आंदोलन करीत आहेत पण त्यांच्यावर देखील धोपटशाही चालू आहे. बुलडोजर्स आपले काम चालूच ठेवत आहेत . तेलंगणा सरकारचं म्हणणं असे आहे कि या वनात वाघ,हरीण,इ प्राणी अस्तित्वात नाही आहेत पण हैदराबाद यूनिवर्सिटीच्या एका संशोधनाच्यामते तिथे ७००हुन अधिक फूल झाडांच्या प्रजाती, सस्तन प्राण्...