Posts

गॅलॅक्सि 🌼

Image
प्राजक्ताचा सडा पाहताना  एक वेगळी गॅलॅक्सि दिसतेय  रचना अशी कि कोड्स असावे जणू  सुवास असा कि आठवणींचा ग्लीच असावा  देजावू आठवणींचा असा कि  वेगळीच फुलं असावी तिथे  गोंडा जास्वंद किंवा धतुराच असावा  वेल असावा काकडीचं फुल असावं  कोड्स असावे नसावे स्वप्नात  पण प्राजक्ताचा सडाच दिसावा असा  कि ऐपत इतकी असावी कि पेव्हर ब्लॉक असावे  अंगणात  घेरा नसावा रोपाला मस्त बांध असाव काम  पडावी अशी फुलं कि आठवणी याव्या उजळून  पाहिलेल्या स्वप्नाना शिव्या देता याव्यात  जेवढी फुलं सड्यात आहेत  पण सडा सुंदरच वाटावा असा कि  पोकळी निस्तारता यावी  त्यातच गॅलॅक्सि दिसावी  जिवंतपणी 🌼 अजिंक्य रोकडे  #बाकीआलबेल 

रातराणीच्या झाडाखाली 🌼

Image
झोप अशी हवी  रातराणीच्या झाडाखाली  इंद्रिय अशी हवी कि तृप्त होता होता  पुन्हा जागेत जागेवर यावी  उठल्यावर रंग असे हवे कि सूर्याला लाज वाटावी  लाज अशी हवी कि समाज झेलता यावा  समाज असा हवा कि लाज वाटू नये  लोकं अशी हवी कि समाज बोलता यावा  मुद्दे असे हवे कि तडीस गेले पाहिजेत  तडीला जाणारे विषय असे हवे कि मुद्द्याचे हवे  राग असा हवा कि सगळे एक आले हवे  एक एकता अशी हवी कि हातात हात हवे  भांडण करायला मजबूत हात हवे  हात असे असावे कि दोन हात करताना भीती वाटू नये  भीती अशी हवी कि हात पूढे जाऊ नये  पुढारपण असा हवा कि निस्तरता आला पाहिजे  निस्तरणं असं पाहिजे कि तडीस जावे सारे  मूर्खपणा असलेला बरा आपल्या आपल्या कोषात  कोष असा हवा कि एकटा डुकता बरं वाटावं  एकटेपणा इतका असावा कि  बाकी सारं आलबेल वाटावं  झोप अशी असावी  रातराणीच्या झाडाखाली 🌼 देवा रोकडे  #बाकीआलबेल

माझ्याकडे थोडेफार पैसे हवे होते 💰

Image
स्टॅन्डवर वडा खाताना  आजी येते रोजची फुकटी  तेव्हा वाटतं  माझ्याकडे थोडेफार पैसे हवे होते  झोपलेला बेवडा जेव्हा  किरकोळ फालतू कारणं सांगून  औषध मागतो तेव्हा वाटतं  माझ्याकडे थोडेफार पैसे हवे होते  मित्राचा हवा सिलेंडर संपतो  पोटाचा गोळा गोड गोड खाऊन गुरगुरतो  तेव्हा वाटतं माझ्याकडे थोडेफार पैसे हवे होते  ह्या सणासुदीत जेव्हा फटाके उंच, उंच मुर्त्या आणि उंच रंगांची बेरंग दुनिया बघतो तेव्हा वाटतं माझ्याकडे थोडेफार पैसे हवे होते समाज समाजाची सेवा करून देखावा समाजात करतो  पण असलेले प्रश्न नसल्यागत भासवतो  तेव्हा समाजाला सामोरं जाताना  समाजसेवा करताना वाटतं  माझ्याकडे थोडेफार पैसे हवे होते नसलेल्या वावरात वावर करताना  समाजात नसलेल्या सृजनात सुटा बुटात गेलेले  मातीतून काँक्रिट झालेले मित्र बघताना वाटतं माझ्याकडे थोडेफार पैसे हवे होते पैसा जमवून वापरून उडवून संपवून पुन्हा वाटतं माझ्याकडे थोडेफार पैसे हवे होते🌼

आता सोड ना कविता 🌼

Image
आता सोड ना कविता कुठे ऐकतो  शांत आहे सारं उगा कसली वाट बघतो  मी बोललो कि तुम्ही वाह वाह करताल  झाटाची फाटा मलाच समजणार नाही तुम्ही उगाच फुगताल  हे असं रसिक वगरे  असं कवी वगरे  काही काही नसतं  असं गोड गोड श्रोते वगरे काही नसतं  असले माझ्यागत येडझवे वक्ते वगरे क्वचितच चुत्ये  काहीच काही नसतं  लक्ष्मी बोल  धंदा बोल  तराजू घे आणि किती पाप करू शकतोस ते एकदा तोल  यश लोळण घालेल येड्यागत करू नकोस  असलं नाती गोती आणि असली माणसं  सोन्याची जेजुरी वाटते पिवळी जेव्हा कावीळ आपली  कावीळ झाली कि उतारा हवा  उताऱ्याला सांगाव, तू प्रश्न कर  आलो  ना कामाला  बोल स्वप्न पाहू  असे ना तसे आलबेल होऊ  #बाकीआलबेल

प्ल्यूटो🌼

Image
murphy's law तसा घाणेरडा प्रकार, वैज्ञानिकदृष्ट्या तो काही सिद्ध वगरे झालेला नाहीय पण तो काम करतो खतरनाक, तसं काही गोष्टी सिद्ध व्हाव्याच लागतात असं देखील काही नाही, काही गोष्टी दाबून ठेवाव्या लागतात अंतरमनात, असे जड शब्द लेख तरी भारी बनवतात नशीब कोवळ्या वयात काही पुस्तकं अशी वाचून ठेवली आहेत, त्या शिवाय भूमिकेला भक्कमपणा येत नाही, लोकांना आपण दूरचे वाटू लागतो जेव्हा सगळं तरल दिसू लागतं मग कोणत्या अपेक्षित गोष्टी न का होईना सगळं ठीकच आहे हा अट्टाहास हवा वाटतो, ह्या साऱ्या कोलाहलात आपण आपले विचार आपल्यासोबत होणाऱ्या घटना सगळ्या चिंधी म्हणून जग पाहत असेल तेव्हाच आपण घडत असलेल्या पेक्षा वाईट चिंतून बुध्दासारखे हसत असतो किंवा हळहळत असतो, एकादी गोष्ट वाईट होतच गेली तर ती वाईटच होते असं काही ऐकून पाहून वाचून अजून वाईट होण्याची शाश्वती मिळते त्यावेळेला मोटिवेशन म्हणून राशीभविष्य वाचताना लाभ होईल वाचून अजून हळहळ होते, लाभ होतात ते कोणत्या बाबतीत किती बाबतीत आणि कोणत्या परिप्रेक्षात, कोण काही सहज बोलून जातंय तेव्हा त्याचे शब्द, वागणं लाभामध्ये धरून ठेवायचे असतात का? दिवस चांगल्य

प्रवास आपला कधी नं जावा संपून...✨🏔️

Image
विरान पडलेल्या वाळवंटी प्रदेशात बर्फ अचानक पडावा इगलू मात्र आपला सुका सुका असावा त्यात बॅगेतून आणलेला कांदा मिरची टोमॅटो सारं काढून दोन चार पाईनची फाटी आणून आग लावावी दगडाने दगडावर रगडून तुझ्या माझ्या थरथरत्या हाताला मग आगीची उब त्या आगीवर भगूणं छोटंसं ठेवून करावे पदार्थ आपण हवे नको आपल्याला दोघांनी मिळून भूक मिटवावी घासावर घास छोटे ठेऊन पसरावी पश्मिना चादर तलम झोपावं दोघांनी कुशीत कुशी घालून स्पर्शावर स्पर्श करावा हट्टी बनून झोपेत जागेपणीची स्वप्न पुरी करावी मग पाहिलेली स्वप्न पूर्णत्वास न्यावी मग स्वप्नात स्वप्न बनून राहावं डोळ्यांवर डोळे ठेवावे काजळाने मिटून सकाळ व्हावी चेहऱ्यासमोर एकमेकांच्या चेहरे नवीन वाटावे एकमेकांचे इगलू मधून बाहेर येऊन पुन्हा वाट शोधावी पायावर पाय ठेऊन चालावी दोघांनी  प्रवास आपला कधी नं जावा संपून... अजिंक्य रोकडे

प्रेम करण्यायोग्य जेव्हा कोण मिळेल.. 🌼

Image
प्रेम करण्यायोग्य जेव्हा कोण मिळेल तेव्हा तू जाशील दूर रानात तेव्हा तिथे खूप सारी घनदाट झाडी मिळेल पण ओलावा शोधत असताना तुला समजेल माझे विचार किती तरल होते हातात हात घेऊन जेव्हा वाळूवर पाय रोवून तुम्ही जेव्हा प्रेम करत असाल तेव्हा समजेल माझी नजर क्षितिज भेदत होती  कॅफे मध्ये वाफालणारी थंड कॉफ़ी तुम्ही एका स्ट्राव मधून पिऊ लागाल तेव्हा माझी तहान तुझ्या लाळेपेक्षा मोठी होती हे समजेल तुम्ही एकादी निर्जन जागा पहाल आडवे इन्फ्रंट होत जाल तेव्हा समजेल माझ्या मनात बस स्पर्शाच्या भावना होत्या तुम्ही उभे राहाल बोहल्यावर तेव्हा संगीत असं विरश्री मध्ये असेल पण तूला माझी आठवन येईल आणि समजेल मी कसा सुमधुर होतो.. #बाकीआलबेल अजिंक्य रोकडे

बुध्दालाही प्रश्न पडला पाहिजेल 🌼

Image
जगाविषयीची कटुता विसरून आपण प्रेम करत सुटलो पाहिजेल ह्या साऱ्या सणासुदीत आपण तारखा विसरत राहता आलं पाहिजेल मोजलेले पैसे आलेल्यातून वजा झाल्यावर हसू कायम राहीलं पाहिजेल ह्या साऱ्या वेळेत न होणाऱ्या गोष्टी आपण सहन करत ओठांवर हसू कायम ठेवता आलं पाहीजे काहीही असो आनंदी राहिलं पाहिजेल म्हणणारा कसा चुतिया आहे हे त्याने अंतर्मनाला विचारलं पाहिजेल उगा का कोण बुद्धत्वाला जातो असं वागता आलं पाहिजे कि बुध्दालाही प्रश्न पडला पाहिजेल  कालातीत प्रवास करता आला पाहिजेल अजिंक्य रोकडे #बाकीआलबेल