Skip to main content

उरलो कथेत , कवितेत

आठवतंय का
तुला ओळख करून दिली
नुसरत सोबत
तू रिलेट होत होत
मग मी दूर गेलो
आठवतंय का
ओळख करून दिली 
फैज सोबत
तू आणि मी 
हम देखेंगे
पाहत होतो
आठवतंय का
गुलजार ऐकला 
हेडफोन एक
ए जिंदगी गले लगाले 
आपण हातच दिले हातात
आठवतंय का 
तेहजिब बोलला 
उसी जगह पर जहाँ कई रास्ते मिलेंगे 
पलट के आए तो सबसे पहले तुझे मिलेंगे
आता नाही आठवणार तुला
आठवतंय का
आपण भेटलो जॉनला
जॉन बोलला 
वक्त बुरा था आप तो अच्छे रहते
नसेल आठवत
कारण तो जॉन होता
सगळं आता नसेल आठवत
तेहजिब आणि जॉन
लोकं ऐकत नाहीत
नाही आठवणार
बघ आठवतंय का 
मी सगळं
ऐकवलं 
दाखवलं
सुनावलं 
तू आणि मी
कथेत कवितेत उरलो
ते माझ्यासोबत आहेत

अजिंक्य रोकडे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

किर्रर्र 🍃

   लाकडी आरामाखुर्चीवर जेव्हा रघु बसला तेव्हा 'किर्रर्र' असा आवाज आला, विचारांची साखळी काही वेळा साठी स्तब्ध झाली आणि पुन्हा स्वतःला कमफॉर्टेबल करून घेतल्यास ती साखळी नव्या विचारांना वाट करून देऊ लागली... रघु नुकताच कामावरून आलेला, समाधानी वाटाव इतकं समाधान तर होतच त्याचाकडे पण मन सैरावैरा, कानात वारा गेलेल्या वासारा सारखं वेडंवाकडं पळत होतं, ह्याच कारण अचानक गार वारं सुटलेलं, हवेत गारवा आलेला आणि त्यासोबत पालापाचोळा उडत खिडक्यानमधून आतमध्ये येत होता, एरवी तो कचराच जणू पण आज ते काहीतरी भासवत होतं, रघुने जेव्हा पहिल्यांदा गाडी घेतलेली तेव्हा लीलासोबत रघु बाईकने फिरायला गेलेला, चहाच्या टपरीवर थांबले असताना असंच काहीसं वातावरण तयार झालेलं, तिचे केस तेव्हा हवेत एक फ्रेम बनवून आकाशासोबत एक सुंदर कलाकृती बनवू पाहत होते, चहाच्या वाफा तिच्या चसम्यावर येऊ पाहत होत्या आणि ती चष्मा व्यवस्थित करू पाहत होती, ओढणी सांभाळत होती अशी तिची अल्लड गडबड झालेली, रघुच्या मनात एक सुंदर आठवन, आयुष्यात घडलेल्या चांगल्या गोष्टींच्या यादीत त्यांनी ठेवलेली ती आठवण आज मनात ह्या वातावरणाने रेंगा...

म्हातारा चांगला होता..... 🌱

घरा सुधरू लागली हात, वाडीतली पोरा मोठी व्हाया लागलीत हात, पैसा आलाय, म्हातारा गेल्यापासून एकटीच मरतेय ह्या मापाच्या घरात, मला तरी कशाला हवाय मरायला चांगला घर, पोरा बाला असती तर एकांदी बारीस वाटला असता, काय रुबाब होता नय, सावकार आमचा म्हातारा मेला दारू नी वाट लावलंन नाहीतर काय जमीन म्हणून होती, नवीन आलली घरी तेव्हा म्हतारा अडल्या नडल्या माणसाला उभा राहायचा, आता कोण बोलील काय?मला पण नको झालाय हा जिना, म्हाताऱ्याची रया गेली ती जमीन लुबाडलिन तेवा, नाहीतर म्हातारा माझा चांगला होता,शेती वर सगला संसार उभा केलेलंन, पण जमीनच परकी झाली आणि म्हातारा येडाच झाला, दारू काय आणि मला शिव्या काय,आंब म्हणून काय यायचं, मला पिऊन आला कि बोलायचा आपली कलमा आणि तू एकसारखी मेली वांझोटी झालीयत, मी आपली गप गार देव्हाऱ्यात जाऊन टिपा गालित बसायची, कुणाला सांगणार, भयनी झाल्या तरी त्यांना त्यांचा याप काय कमी होता, मेली ही पुरुष जातच घोड्यान काढलली, किती पण जीव आटवा मेली बाई माणसाला ऐकून दाखवतील, मेली गुलाम झाली नाय ती कधी, तसा होता मेला चांगला पैसं कमी झाल्यावर डालगी बनवू लागलेला, हाताला कला होती, असा उपा...

वस्तूंचा मोह सुटावा 🫴🌱

संघर्ष कुणाला नाही चुकला म्हणा, हे असं उदास आणि निराश वाटणं साहजिकच असतंय, मी बरेच जणांना पाहिलं आहे आव आणताना कि पहा किती पॉसिटीव्ह वगरे आहे पण सुखी तो असतो किंवा दिसतो, जो व्यक्त होत नाही.... मी नेहमी पाहत असतो पेजेस फेसबुक वर ज्यावर वेगळी वेगळी पेंटिंग्स वगरे असतात vincent van gogh सोबत ओळख झाली रमायला होतं त्याचा चित्रात, व्हिन्सेंट व्हॅन गॉग हा खरंच सध्या माझ्या आवडत्या कलाकारांपैकी एक झाला आहे, मी आता आता त्याचासोबत कनेक्ट होऊ लागलो, त्याची दुनिया रंजक आहे, जादुई आहे जे जे आपल्याला प्रश्न भेडसावत असतात त्यांना तो उत्तर आहे.... नैराश्य, चिंता आणि हजारो लफडी आणि स्वतःबद्दलची कीव आपण ज्या ज्या सोबत झुंजत आलो, भांडत आलो, निस्तरत आलो पण हे काही रडल्यागत नाही सांगत कॉमन आहे आणि सगळ्यांना मान्यच असतं थोड्याअधिक प्रमाणात ते आपलं 🫴 so called दुःख, पण काहीतरी सकारात्मक नसेल निष्कर्ष तर त्या कलेला आणि कलेच्या माऱ्याला काय अर्थ......  व्हॅन गॉगप्रमाणेच, मलाही नेहमीच रात्रीच आकर्षण राहिलं आहे. त्याच्यासाठी रात्र प्यारी होती आणि दिवसभराच्या कामानंतर त्याचा त्याचा एक स्पेस होता...