कधी तू , कधी मी !
जगातील पहिली दोन भिन्न लिंगी माणसं जेव्हा भांडली असतील तेव्हा त्याचं कारण भूक असेल नाहीतर जास्तीत जास्त विचार केला तर प्रेम असेल , पण जेव्हा ती एकामेकांचा सहवासात किंवा स्पर्शात आली असतील तेव्हा मात्र सर्व विसरून एकरूप झाले असतील तेव्हाच तर तु वाचणारा आणि मी लिहणारा असेन , उद्या तू लिहीत असशील मी वाचत असेन बहुतेक ……
ताफा भुकेचा कुठे न्यायचा आज शिकारीला , हे कोण सांगणार किंवा कोण ठरवणार ह्यावरून पहिला वाद झाला असेल ना तेव्हा कुठेतरी आजच्या राजकारणाची किंवा आजच्या लोकशाहीची , ठोकशाहिची सुरुवात झाली असेल , तेव्हा कुठे तू उभा राहतो आणि मी मतदान करतोय , नाहीतर तू मतदान करतोय मी उभा राहतोय , तू हुकूम देतोय मी सलाम करतोय आणि काहीसं vice versa ….
कुठेतरी झाडाखाली चिमण्या हागल्या तेव्हा झाडं आली नवीन पालवी फुटली , तुझ्या माझ्या सारख्या कुणाला तरी शेतीची संकल्पना सुचली आणि आज तू पण उपाशी नाही आणि मी पण नाहीय , अपवाद उपाशी आहेत … म्हणून तर आज तू शेतकरी आणि मी खातोय , तर कधी मी शेतकरी आहे आणि तू खातोय…….. हमीभावासाठी आंदोलन पण करतोय ….
कुणीतरी गोल दगड फिरवला एकांताचा विट येऊन , मडकी झाली आणि चाकं झाली गाड्या आल्या , कधी तू ड्रायव्हर तर कधी मी प्यासेंजर तर कधी मी ड्रायव्हर…. आज तू गियर टाकताना विचार कर…..!
कुणीतरी बनवल्या कलाकृती , चित्र , शीलालेख म्हणून आज उत्खननात सापडत आहे कधी तू , तर कधी मी , सर्व तेच आहे , सर्व तिथेच आहे , काहीच बदललं नाही , बदलत आहे तर फक्त एकच , कधी तू , तर कधी मी…..!!
अजिंक्य रोकडे
Very nice bro😀
ReplyDelete